
नांदुरा : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपताच आता ग्रामीण भागातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वेध लागले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे इमानेइतबारे काम केल्याचा मोबदला म्हणून अनेक कार्यकर्त्यांना आता जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य होण्याचे स्वप्न पडू लागले असून त्या त्या इच्छुकांनी तशी फिल्डिंग आतापासूनच लावायला सुरुवात केली आहे.