

Akola
esakal
अकोला: महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ च्या अंमलबजावणीला गती मिळाली असून, जिल्ह्यातील २९ हजार ८८५ कर्जखात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर यशस्वीरित्या अपलोड करण्यात आली आहे. विभागातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शंभर टक्के माहिती अपलोड करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करत योजनेच्या प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.