Success Story :गाव तलावातून साडेबाराशे एकरांवर सिंचन

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 3 September 2020

 शासनाने कृषी विभागामार्फत गाव तलाव, पाझर तलाव, मागेल त्याला शेततळे आदी योजना राबविल्यात. त्यातून सात गावातील साडे बाराशे एकरांवर सिंचन सुविधा निर्माण झाल्या असून, आदिवासी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे.

तेल्हारा  (जि.बुलडाणा):   शासनाने कृषी विभागामार्फत गाव तलाव, पाझर तलाव, मागेल त्याला शेततळे आदी योजना राबविल्यात. त्यातून सात गावातील साडे बाराशे एकरांवर सिंचन सुविधा निर्माण झाल्या असून, आदिवासी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे.

तेल्हारा तालुक्यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून योजना राबविण्यात आल्यात. आदिवासी भागातील धोंडा आखर, चिपीभिली, झरी बाजार, पिंपरखेड, बोरव्हा, रुपागड व हिवरखेड परिसरात गाव तलाव, पाझर तलाव, मागेल त्याला शेततळे, माती नाला, गाळ काढणे, गाव तलाव चौपन, पाझर तलाव आदी कामे झालीत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यात तीन जुने सिमेंट नाला खोलीकरण, ९४ माती नाला बांध गाळ काढणे, मागेल त्याला शेततळे २४९ आदी ४६३ कामांचा समावेश आहे. या गाव तलावांमधे पाणीसाठा २१६० टीसीएमवर आहे. त्यातून ७६४ एकरावर सिंचन होऊ शकते. पाझर तलावात १६० टीसीएम जलसाठा असून, त्यातून २६ एकर सिंचन होऊ शकते.

जुने सिमेंट नाला बांध खोलिकरणाची ९४ कामे झाली आहेत. त्यात ५६४ टीसीएम जलसाठा असून, त्यातून १८८ एकरावर शेती सिंचनाखाली येणार आहे. माती नाला बांध गाळ काढणे यातून २८७ टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यातून ९६ हेक्टर सिंचन होऊ शकते. शेततळे योजने अंतर्गत २४९ कामे झाली. त्यात आज घडीला २९८ टीसीएम पाणीसाठा आहे. त्यातून १४५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते. या कामांमुळे आदिवासी भागातील तब्बल १२५० एकरांवर यावर्षी सिंचन करू शकतील.

प्रत्येक गावात हवे जलयुक्तची कामे
शासनाने तालुक्यातील प्रत्येक गावात पुन्हा जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कामे केल्यास शेतकरी तलावामधून पाणी घेऊन पीक उत्पादन वाढवू शकतो. सातपुडा पर्वतामधून ५२ नदी-नाले वाहतात. पावसाळ्यात या नदी-नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. हे पाणी अडविण्यासाठी शासनाने उपाय योजना केल्यास मोठ्या प्रमाणावर शेतकरी शेती सिंचन करू शकतात, असे खंडाळा येथील शेतकरी दिलिप सागुंनवेढे यांनी सांगितले.
 
भूजल पातळी वाढली
तालुक्यात आतापर्यंत झालेल्या जलसंधारण कामामुळे बोर, विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले. सातपुड्याच्या पायथ्याशी जलसंधारणाची कामे झाल्यास भूजल पातळीत आणखी वाढ होऊ शकते. या जलसंधारणाच्या कामामुळे यापेक्षाही अधिक प्रमाणात शेती सिंचनाखाली आणून आणि जमिनीतील भूजलाची पातळी वाढविण्यास मदत होऊ शकते.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Irrigation:on one and a half hundred acres from village lake