esakal | अरे हे काय ! अकोल्यात चक्क कारागृहातील १८ कैद्याना कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

akola 18 inmates of Chakka Jail in Akola infected with corona

अकोल्यात कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. आता याच कोरोनाने जिल्हा कारागृहात प्रवेश केला असून, बुधवारी (ता.२४) प्राप्त झालेल्या एकुण २२५ अहवालापैकी ५४ अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यातील १८ पॉझिटिव्ह अहवाल हे जिल्हा कारागृहातील संदर्भित असल्याची माहिती आहे. सोबतच आज आणखी तीन मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अरे हे काय ! अकोल्यात चक्क कारागृहातील १८ कैद्याना कोरोनाची लागण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः अकोल्यात कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. आता याच कोरोनाने जिल्हा कारागृहात प्रवेश केला असून, बुधवारी (ता.२४) प्राप्त झालेल्या एकुण २२५ अहवालापैकी ५४ अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यातील १८ पॉझिटिव्ह अहवाल हे जिल्हा कारागृहातील संदर्भित असल्याची माहिती आहे. सोबतच आज आणखी तीन मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी प्राप्त अहवालात ५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात १८ पुरुष रुग्ण हे जिल्हा कारागृहातून संदर्भित आहेत. उर्वरित ३६ जणांमध्ये १४ महिला आहेत. तर २२ पुरुष आहेत. त्यात एका तीन महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. यातील सात जण तारफैल, सात जण न्यू तारफैल, दगडीपुल येथील चार जण, खदान येथील दोन जण, बाळापूर येथील दोन जण, तर उर्वरित बार्शीटाकळी, कामा प्लॉट, सिंधी कॅम्प, रामदासपेठ, सिव्हिल लाईन्स, शिवर, जीएमसी होस्टेल, कळंबेश्वर, जळगाव जामोद, लहान उमरी, कान्हेरी गवळी, सिद्धार्थ नगर, आदर्श कॉलनी, परदेशीपुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

तीन जणांचा मृत्यू
दरम्यान मंगळवारी (ता.२३) रात्री तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात सोनटक्के प्लॉट येथील ७० वर्षीय पुरुष असून ते १२ जून रोजी दाखल झाले होते. अन्य एक डाबकी रोड येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्ण असून हे ९ जून रोजी दाखल झाले होते. तर कामा प्लॉट येथील ८० वर्षीय महिला रुग्ण असून ही महिला २१ जून रोजी दाखल झाली होती.

सहा जणांना डिस्चार्ज
दरम्यान बुधवारी सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील तिघांना घरी सोडण्यात आले आहे तर अन्य तिघांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात पाठवण्यात आले आहे.

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- १२९८
मयत-७० (६९+१)
डिस्चार्ज- ८३२
दाखल रुग्ण - ३९६

loading image