पीक विमाच्या साईटवरून तालुक्‍यातील 4 गावे गायब, विमा काढण्यापासून पासून शेतकरी राहतील वंचित

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 7 July 2020

धानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी बहुतांश वेळा लाभ दायक ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विमा काढण्यावर भर असतो. यावर्षी 1 जुलैपासून पीक विमा काढण्यास सुरवात झाली असून, अंतिम तारिख 31 जुलै आहे. सध्या ठिकठिकाणी सीएससी सेंटरवर पीक विमा काढण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहे. मात्र संग्रामपूर तालुक्‍यातील चार गावाचे नाव या साईड वरून गायब झाल्याने या गावात शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे.

पातुर्डा बु,:  प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी बहुतांश वेळा लाभ दायक ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विमा काढण्यावर भर असतो. यावर्षी 1 जुलैपासून पीक विमा काढण्यास सुरवात झाली असून, अंतिम तारिख 31 जुलै आहे. सध्या ठिकठिकाणी सीएससी सेंटरवर पीक विमा काढण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहे. मात्र संग्रामपूर तालुक्‍यातील चार गावाचे नाव या साईड वरून गायब झाल्याने या गावात शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे.

वानखेड भाग 2, सोनाळा भाग 2, लंडणापूर भाग 2, व एकलारा बानोदा या गावांची नावे पीक विम्याच्या संकेत स्थळावरून गायब आहेत. शेतकरी ता.3 जुलै रोजी गावातील व ईतर ठिकाणच्या सीएससी सेंटरवर प्रधानमंत्री पीक विमा योजनाचे फॉर्म ऑनलाईन भरायला गेले असता त्या साइडवर वरिल चार गावाचे नावच येत नाही. गट नंबर व सर्व्हे नंबर टाकला तर त्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीचे नाव येत आहे. अशातच शेतकरी चिंतीत आहे. प्रधानमंत्री पीक विमाचे बुलडाणा जिल्ह्याचे काम रिलायंस इन्शुरन्स कंपनीला दिले आहे. या कंपनीकडून काही चूक झाली की सरकारकडून हेच समजत नाही; परंतु यामध्ये शेतकरी पीक विमा काढण्या पासून वंचित राहतील का असा सवाल समोर येत आहे?

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

काही शेतकऱ्यांकडून फोन आले की, साहेब आम्ही पीक विमा काढायला गेलो, तेव्हा त्या साइडवर आमचे गाव येत नाही. तेव्हा लगेच आम्ही रिलायन्स इन्शुरन्स कपनी बुलडाणाला पत्र दिले व ते दोन तीन दिवसात तांत्रिक चूक दूर करतो असे सांगितले.
- अमोल बनसोडे तालुका कृषी अधिकारी संग्रामपूर

माझ्याकडे कंपनीने संग्रामपूर तालुका दिला आहे. ज्या वेळेस अशा तक्रारी प्राप्त झाल्या तेव्हा मी कृषी अधिकारी यांना भेटून कंपनीच्या जिल्ह्या कार्यालयाला पत्र द्यायला लावले व ताबडतोब ही अडचणी दूर करण्याची सूचना केली.
-श्री वणारे साहेब,रिलायंस इन्शुरन्स कंपनी संग्रामपूर तालुका प्रतिनिधी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola 4 villages in taluka disappear from crop insurance site, farmers will be deprived from taking out insurance