अकाेला : जलजन्य आजारांचा धोका वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola 89 villages affected by contaminated water health waterborne diseases

अकाेला : जलजन्य आजारांचा धोका वाढला

अकाेला : ग्रामपंचायतींकडे ब्लिचींग पावडर उपलब्ध नसणे व इतर कारणांमुळे जिल्ह्यातील ८९ गावे दूषित पाण्याच्या विळख्यात सापडली आहेत. संबंधित गावातील पाणी नमूने दूषित आढळल्याने नागरिकांच्या आराेग्याचा ग्रामीण भागात खेळखंडाेबा सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान सदर विष जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सुद्धा गंभीरतेने घेतला असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने संबंधित तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्रसुद्धा पाठवण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करता यावा, यासाठी ब्लिचिंग पावडरची खरेदी ग्रामपंचायत स्तरावर होणे अपेक्षित आहे. परंतु जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती ब्लिचिंग पावडर खरेदीत टाळाटाळ करता. त्यामुळे नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा ब्लिचिंग पावडर विनाच करण्यात येताे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना नेहमीच आराेग्याशी संबंधित समस्यांना ताेंड द्यावे लागते. दरम्यान जून महिन्यात जिल्ह्यातील ८९ गावांमध्ये ब्लिचींग पावडर नसल्याने व इतर कारणांमुळे अशुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत आल्याची बाब जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाणी नमूने तपासणी अहवालातून समाेर आली आहे. त्यामुळे संबंधित गावांमध्ये साथराेगाचा खतरा वाढला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

साथ राेगाचा धाेका

दूषित पाणी पिल्यामुळे कॉलरासह इतर साथराेग हाेण्याची शक्यता असते. ग्रामीण भागात शुद्ध पाण्याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे ते स्वच्छ दिसणारे पाणी सुद्धा शुद्ध पाणी समजून पितात, परंतु ते आराेग्यास अपायकारक असते. दरम्यान अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे ग्रामीण भागात साथराेगाची भिती वाढली आहे. सध्या सर्वत्र पाऊस होत असल्याने या दिवसांमध्ये दूषित पाणीपुरवठा झाल्यास त्याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो.

या गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा

  • अकोला - बाखराबाद, रूसलाबाद, मोरगाव, अमानतपूर ताकोडा, खडकी टा., नावखेड, गोणापूर, गोपालखेड, धामणा, वैराट, राजापूर, कापशी, कापशी जुनी, चांदुर, म्हैसपूर, हिंगणा जुना, पळसो बु. व खु., कासमपूर, मादलपूर, शहापूर, सांगळुद, यावलखेड, धोतर्डी, वाशिंबा, अलियाबाद.

  • अकोट - मुंडगाव, उमरा, अकोलखेड, अकोली ज., राजुरा, अंबार्डा.

  • बाळापूर - धाडी बल्हाडी, तांदळी, वाडेगाव.

  • बार्शीटाकळी - झोडगा,टेंभी, सारकिन्ही, हातोडा.

  • मूर्तिजापूर - कार्ली, राजुरा, सनोळा, पळसोडा, गौलखेडा, तुरखेड, एंडली, पिंगळा, नवसाळ, जामठी, मंदुरी.

  • पातूर - सांगवी, कार्ला, शेकापूर, बैलताडा, आलेगाव, देउळगाव, भाणोस, सावरगाव, झरांडे, पांगरताटी, उमर, राहेर, गावंडगाव, सायवणी, मळसूर, पाडसिंगी.

  • तेल्हारा - दानापूर, चांगलवाडी, इसापूर, जाफ्रापूर, झरी बा., वारखेड, बारूखेडा, उमरी, आडसूळ, डवला, मनात्री बु., तुतगांव, वडगाव रो.

Web Title: Akola 89 Villages Affected By Contaminated Water Health Waterborne Diseases

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top