...त्याने पोलिसांना हातपाय तोडण्याची दिली होती धमकी, मात्र घडले उलटच

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 20 June 2020

पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करीत त्यांना हातपाय तोडण्याची धमकी देणाऱ्या ताज शरीफ राणा याचा अटक पूर्व जामीन अर्ज अकोटचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी फेटाळून लावला.

अकोट (जि.अकोला) : पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करीत त्यांना हातपाय तोडण्याची धमकी देणाऱ्या ताज शरीफ राणा याचा अटक पूर्व जामीन अर्ज अकोटचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी फेटाळून लावला.

ताज शरीफ राणा विरोधात कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना धमकी देणे, अश्लील शिवीगाळ करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे अशा स्वरुपाची फिर्याद स्वतः शहर पोलिस स्टेशनला ठाणेदार संतोष महल्ले यांनी ३० मे रोजी दिली होती.

या प्रकरणात पोलिस प्रशासनातर्फे अजित देशमुख यांनी युक्तीवाद केला असून, दोन्ही युक्तीवाद ऐकल्यानंतर विद्यमान कोर्टाने ताज राणा चा अटक पूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. विशेष म्हणजे या प्रकरणात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक यांनी तातडीने संबधित तीनही पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या विविध पोलिस स्टेशनला केल्या. तेव्हापासून ताज शरीफ राणा फरारच असून, जामीन मिळवण्यासाठी तो अतोनात प्रयत्न करत असल्याचे दिसून येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola The accused's bail was finally denied and the police threatened to break his limbs