

Akola News:
esakal
अकोला : एमआयडीसी ४ परिसरात विनापरवाना जैव उत्तेजकांची विक्री आणि साठवणूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने मंगळवारी उशिरा रात्री मोठी कारवाई करत तब्बल ९२ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी MIDC पोलिस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ आणि खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.