
अकोला : मंगळवारी अमरावती विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले असून अमरावती ते मुंबई उड्डाण सेवा सुरू करण्यात आली. अकोल्याच्या विमानतळ स्थापनेच्या ५० वर्षांनंतर अमरावती विमानतळ बांधण्यात आले तरी मात्र अकोल्याच्या आधी अमरावती विमानतळ सुरू करण्यात आल्याने हे अकोल्यातील स्थानिक भाजपा लोकप्रतिनिधींचे अपयश असून त्यांच्या उदासीन धोरणाने अकोला विमानतळाचे काम रखडले असल्याचा घणाघाती आरोप आ. साजिद खान पठाण यांनी केला.