चोरी, घरफोडीतील सराईत सहा गुन्हेगार तीन जिल्ह्यांतून तडीपार

पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले.
Akola
AkolaSakal

विटा : चोरी, घरफोडी करणाऱ्या विटा येथील सहा सराईत गुन्हेगारांच्या टोळीला सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले. गणेश संभाजी तुपसौंदर्य ( वय ३५, विवेकानंदनगर, विटा ), सुरज मनोज कांबळे ( वय २१ ), रोहित शाम कांबळे‌ (वय २४ ), गणेश अशोक घेवदे ( वय २५ ), आकाश ऊर्फ अतिश राजु वायदंडे‌ ( वय १९, सर्व रा. फुलेनगर, विटा, ता. खानापूर ), प्रमोद मधुकर यादव ( वय ३०, रा. क-हाड ) अशी त्यांची नावे असल्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले.

विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये या टोळीविरुद्ध २०२० मध्ये शेतजमिनीतील विहीरीवरील पाण्याची मोटार व एच.टी.पी पंप चोरणे, गुरे चोरी करणे असे तीन मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळी विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये तडीपारचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना पाठविला होता. त्यानुसार या टोळीला सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

Akola
पेट्रोलला आले 'अच्छे दिन'! दरवाढीचा सपाटा कायम

असे श्री. डोके यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, निरज उबाळे, संतोष डोके, सिध्दाप्पा रुपनर, दीपक गट्टे, अमर सुर्यवंशी, अमोल लोहार, हणमंत लोहार, शशिकांत माळी, सुरेश भोसले, राजेंद्र भिंगारदेवे, रोहित पाटील यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com