Akola Crime : दारूच्या नशेत मित्राचा जीव घेतला;अकोल्यात हत्यांचे सत्र सुरूच, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
Crime News : अकोला शहरातील रमाबाई आंबेडकर नगरात शनिवारी मध्यरात्री दोन मित्रांमध्ये दारूच्या नशेत वाद झाल्यावर एकाने दुसऱ्याचा खून केला. टकल्या ऊर्फ पवनने रागाच्या भरात प्रकाश जोसेफला दगड घालून ठार केल्याची घटना घडली आहे.
अकोला : शहरात सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना घडली असून, जुन्या शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या रमाबाई आंबेडकर नगरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत दोन मित्रांमध्ये झालेल्या वादाचे परिणीती एका युवकाच्या हत्येत झाली.