

Akola News
esakal
अकोला: शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. कोठडीत असलेल्या एका महिलेशी गैरवर्तन करून दहा हजार रुपये देण्याचे आमिष दाखवत तिच्या मुलीला एका रात्रीसाठी पाठवण्याची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेश जाधव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दखल घेत एएसआयला तात्काळ निलंबित केले.