अकोल्यात सरासरी एक कोरोना बळी, तीन महिन्यांत 90 मृत्यू

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 8 July 2020

अकोल्यात 7 एप्रिल रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. 7 जून रोजी तीन महिने होत आहेत. अशातच रुग्णसंख्या 1800 च्या जवळपास जाऊन पोहचली आहे तर मृत्यू 90 पर्यंत जाऊन पोहचले आहेत. या मृत्यूची सरासरी काढली असता अकोल्यात तीन महिन्यात दरदिवसाला एक मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.

अकोला  ः अकोल्यात 7 एप्रिल रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. 7 जून रोजी तीन महिने होत आहेत. अशातच रुग्णसंख्या 1800 च्या जवळपास जाऊन पोहचली आहे तर मृत्यू 90 पर्यंत जाऊन पोहचले आहेत. या मृत्यूची सरासरी काढली असता अकोल्यात तीन महिन्यात दरदिवसाला एक मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेलेले 60 टक्के रुग्ण हे 60 ते 80 या वयोगटातील असून, त्यांच्यात मधुमेह, हृदय व मुत्रपिंडासंदर्भातील जुन्या व्याधींची लक्षणे आढळल्याचे वैद्यकीय सुत्रांचे म्हणणे आहे. एका रुग्णाची आत्महत्या तर उर्वरीत दोन रुग्ण वगळता मृत्यू झालेले सर्व रुग्ण हे 40 वर्षांपुढील आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

वैद्यकीय सुत्रांच्या माहितीनुसार, बाधिताच्या संपर्कात आल्याने सर्वच वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लागण होते. मात्र ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांच्यात लवकर लक्षणे दिसतात. अनेक ज्येष्ठांमध्ये जुन्या व्याधी असल्याने त्यांच्या लक्षणे अधिक तिव्रतेने आढळतात. तेच युवकांमध्ये लक्षणे दिसत नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे शक्‍यतो 60 वर्ष वयोगटापुढील नागरिकांनी बाहेर पडणे टाळायला हवे, याशिवाय जुन्या व्याधी असणाऱ्यांनीही गर्दी किंवा बाहेर फिरणाऱ्या व्यक्तीपासून स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्‍टरांकडून करण्यात येते.

सर्वाधिक मृत्यू 60 वर्षांपुढील
आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार 40 ते 80 वर्षे वयोगटातील रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये सर्वाधित मृत्यू हे 60 वर्षे वयोगटातील नागरिकांचे झाल्याचे दिसते. वयस्क नागरिकांना लवकर लागण होऊन उपचारास विलंब झाल्यास मृत्यू ओढावू शकतो. दरम्यान अनेक रुग्णांचा अहवाल मृत्यूनंतर कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, अशीही वैद्यकीय सुत्रांची माहिती आहे.

90 दिवसात 89 बळी
जिल्ह्यात 7 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. एप्रिल अखेरपर्यंत कोरोनामुळे दोन बळी गेले होते. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासून पॉझिटिव्ह रुग्णांबरोबर बळींचा आकडाही वाढत गेला. 90 दिवसात तब्बल 89 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

असा वाढला बळींचा आकडा

 • 15 एप्रिल ः 1
 • 29 एप्रिल ः 1
 • 1 मे ः 1
 • 2 मे ः 1
 • 3 मे ः 2
 • 6 मे ः 4
 • 8 मे ः 1
 • 10 मे ः 1
 • 11 मे ः 1
 • 13 मे ः 1
 • 15 मे ः 2
 • 17 मे ः 1
 • 19 मे ः 2
 • 21 मे ः 1
 • 22 मे ः 2
 • 24 मे ः 1
 • 25 मे ः 1
 • 26 मे ः 3
 • 28 मे ः 1
 • 30 मे ः 1
 • 31 मे ः 2
 • 1 जून ः 2
 • 6 जून ः 2
 • 7 जून ः 1
 • 8 जून ः 2
 • 9 जून ः 1
 • 10 जून ः 2
 • 11 जून ः 1
 • 12 जून ः 1
 • 13 जून ः 2
 • 14 जून ः 5
 • 15 जून ः 2
 • 16 जून ः 3
 • 18 जून ः 2
 • 19 जून ः 1
 • 20 जून ः 5
 • 21 जून ः 2
 • 23 जून ः 1
 • 24 जून ः 4
 • 25 जून ः 2
 • 26 जून ः 00
 • 27 जून ः 00
 • 28 जून ः 03 मृत्यू
 • 29 जून ः 00
 • 30 जून ः 2 मृत्यू

 

पाच दिवसातील स्थिती

 • जुलै ः - 1
 • जुलै ः - 03
 • जुलै ः 01
 • जुलै ः 04
 • जुलै ः 01

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola averages one corona victim, 90 deaths in three months