Akola Crime News: १६ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पोलिसाने ठेवले संबंध, नंतर दिला नकार; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

POCSO Case Sparks Public Outrage in Akola: अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे अल्पवयीन मुलीच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरिकांनी मोर्चा काढला.
Akola Crime News

Akola Crime News

esakal

Updated on

बाळापूर: लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणे व तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपी पोलिस कॉन्स्टेबल पवन वडगावे याच्यावर ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी आज बाळापूर शहरात सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरिकांनी भव्य मोर्चा काढत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना निवेदन देण्यात आले. गुन्हा दाखल होऊन १२ दिवस उलटल्यानंतरही आरोपी मोकाट असल्याने नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com