अकोला जिल्ह्यात ४५० कोटींचे व्यवहार ठप्प

सर्वच शाखा बंद राहिल्याने अकोला जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बील ४५० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले होते.
Bank Emplyee Protest
Bank Emplyee ProtestSakal

अकोला : बँक कर्मचाऱ्यांनी खासगी करण्याच्या विरोधात पुकारलेल्या दोन दिवसीय संपाच्या पहिल्याच दिवशी अकोला शहर व जिल्ह्यातील राष्ट्रीय कृत बँकांच्या २८०० शाखांमधील १३ हजार कर्मचारी सहभागी झालेत. सर्वच शाखा बंद राहिल्याने अकोला जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बील ४५० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले होते. त्याचा सर्वाधिक फटक सर्वसामान्य नागरिकांसोबत मोठ्या व्यावसायिकांना बसला.

गुरुवारपासून देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी खासगी करणासह विविध मागण्यांसाठी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपात देशभरातील १० लाखांवर कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले आहेत. बँक खासगी करणाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. बँकांचे खासगीकरण हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या हितचे नाही.

Bank Emplyee Protest
नागपूर : विकास ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांवरील गुन्हे रद्द

बँकांच्या हिताचे नाही. बँक ग्राहकांना त्याचा फटका बसणार आहे. बँकींग उद्योगापुढे एनपीएमुळे जे प्रश्न उभे आहेत, त्यावर बँक खासगीकरण हा निश्चितच उपाय नाही. बँक खासगीकरण हे कोणाच्याही हिताचे नसल्याने त्याविरुद्ध बँक कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारत संपाचे हत्त्यार उपसले आहे. अकोला शहर जिल्ह्यातील बँक कर्मचारी, अधिकारीही या संपात सहभागी झाल्याने सर्व राष्ट्रीय कृत बँकांचे व्यवहार ठप्प होते.

सात संघटनांचा संपात सहभाग

बँक कर्मचाऱ्यांच्या सात संघटनांनी युनायटेड फोरमतर्फे बँक खासगी करणाविरुद्ध संप पुकारला आहे. या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी स्टेट बँक ऑफ इंडिया, आदर्श कॉलनी शाखा येथे एकत्र येत निदर्शने केली. बँक कर्मचाऱ्यांचे नेते श्याम माईणकर, दिलीप पिटके, सुनील दुर्गे, पराग देशमुख यांच्या उपस्थितीत ही निदर्शने करण्यात आली. यावेळी अकोला शहरातील विविध बँकांचे २०० च्यावर कर्मचारी उपस्थित होते.

Bank Emplyee Protest
अकोला : मनपा निवडणुकीला ओबीसी आरक्षणाची बाधा!

अनेक ग्राहक बँकांपर्यंत येऊन परतले माघारी

बँक कर्मचाऱ्यांच्या दोन दिवशीय संपामुळे जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार बंद होते. अनेक बँक ग्राहकांनी शहरातील विविध बँकांच्या शाखेत आल्यानंतर त्यांनी बँक बंद असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांना निराश होऊन आल्या मार्गी परत जावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com