esakal | कोरोनाच्या लढाईत मूर्तिजापूरच्या नगराध्यक्षा पदर खोचून उतरल्या मैदानात
sakal

बोलून बातमी शोधा

akola In the battle of Corona, the mayor of Murtijapur lost his position

शहराच्या २३ वार्डातील संभाव्य कोरोना रुग्ण शोधण्याच्या मोहिमेवर निघालेल्या ९२ कोरोनायोद्ध्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी स्वतः नगराध्यक्षा मोनालीताई कमलाकर गावंडे पदर खोचून मैदानात उतरल्या सून घरोघर फिरत आहेत.

कोरोनाच्या लढाईत मूर्तिजापूरच्या नगराध्यक्षा पदर खोचून उतरल्या मैदानात

sakal_logo
By
प्रा.अविनाश बेलाडकर

मूर्तिजापूर (जि.अकोला)  : शहराच्या २३ वार्डातील संभाव्य कोरोना रुग्ण शोधण्याच्या मोहिमेवर निघालेल्या ९२ कोरोनायोद्ध्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी स्वतः नगराध्यक्षा मोनालीताई कमलाकर गावंडे पदर खोचून मैदानात उतरल्या सून घरोघर फिरत आहेत.


उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, मुख्याधिकारी विजय लोहकरे आणि वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजेंद्र नेमाडे यांनी पालिकेच्या सभागृहात आयोजित कार्यशाळेत सविस्तर तंत्रशुद्ध मार्गदर्शन केल्यानंतर अॉक्सीमिटर आणि थर्मल स्कॕनर अशा कोरोनाविरोधी लढ्यातील आयुधांसहा सह ९२ कोरोनायोद्धै परवापासून मोहीमेवर निघाले आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कोरोना संभाव्य रुग्ण शोधण्याच्या अनुषंगाने शहराची प्राथमिक तपासणी करण्यासाठी पालिका कर्मचारी, अंगणवाडी सेविका व उपजिल्हा रुग्णालयच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असणारी एकूण २३ पथके तयार करण्यात आली आहेत .

प्रत्येक पथकाला पालिकेकडून एक ऑक्सीमिटर व एक थर्मल स्कॅनर देण्यात आले आहे. त्याच्या वापरा संबंधीच्या सर्व सूचना डॉ. राजेंद्र नेमाडे यांनी दिल्या. ५० पेक्षा जास्त वय, ९५ पेक्षा कमी ऑक्सीजन प्रमाण व तापाचे प्रमाण असणाऱ्यांची नोंदही पथके घेतील. मुख्याधिकरी विजय लोहकरे यांनी सर्व पथकांना खबरदारीचे उपाय व वेळोवेळी येणाऱ्या अडचणी संदर्भात  मार्गदर्शन केले आहे. 

प्रत्यक्षात मात्र या पथकांना नागरिकांचे सहकार्य मिळत नाही. तपासणीसाठी समोर येण्याचे नागरिक टाळतात. त्यांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा आणि योध्द्यांचे मनोधर्य खचू नये म्हणून नगराध्यक्षांनी पदर खोचला आणि या पथकांच्या मदतीला धावून गेल्या. नागरिकांना तपासणीसाठी त्या स्वतः प्रोत्साहीत करीत आहेत. त्यांचा प्रयास फलद्रूप ठारत आहे. मोहीम फत्ते होण्याचे संकेत मिळत आहेत.

असे आहे तपथक
५२ नगर परिषद कर्मचारी
 २० नगर परिषद शिक्षक
१६ अंगणवाडी सेविका
४ लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हारुग्णालयाचे कर्मचारी
असे एकूण ९२ कर्मचारी शहराची प्राथमिक तपासणी करीत आहेत.


या मोहीच्या परिणामस्वरुप गरोदर महिला व ५० पेक्षा वय जास्त असणाऱ्यांपैकी अॉक्सिजनचे प्रमाण ९५  पेक्षा कमी असणाऱ्यांना व रक्तदाब, मधुमेहासारखा आजार असणाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल. सर्दी, खोकला, ताप असणारे व गरोदर मातांचा स्वॕब तपासणीसाठी पाठविला जाणार आहे.

(संपादन-विवेक मेतकर)