

Akola Civil Lines Police take action against two men for allegedly circulating videos of occult-like activities.
esakal
अकोला : लिंबू हवेत तरंगविण्यासारखे जादूटोण्यासदृश प्रकार करून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या दोघांविरुद्ध सिव्हिल लाईन पोलिसांनी कारवाई केली आहे.
या प्रकारांमुळे परिसरात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.