esakal | चार लघुपाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के; नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Buldana four small scale irrigation projects one hundred percent; Sewage flowing, alert to villages along the river

सततच्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांमध्ये यावर्षी समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाला आहे. जळगांव जामोद तालुक्यातील प्रकल्पांचा अपवाद वगळता लघु पाटबंधारे प्रकल्प तुडूंब होण्याच्या मार्गावर आहेत. खामगांव तालुक्यातील हिवरखेड क्रमांक १ व ३ व ढोरपगांव तसेच टाकळी लघु पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के पाण्याने भरले असून, सांडवा प्रवाहीत झालेला आहे.

चार लघुपाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के; नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By
अरूण जैन

बुलडाणा  ः सततच्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांमध्ये यावर्षी समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाला आहे. जळगांव जामोद तालुक्यातील प्रकल्पांचा अपवाद वगळता लघु पाटबंधारे प्रकल्प तुडूंब होण्याच्या मार्गावर आहेत. खामगांव तालुक्यातील हिवरखेड क्रमांक १ व ३ व ढोरपगांव तसेच टाकळी लघु पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के पाण्याने भरले असून, सांडवा प्रवाहीत झालेला आहे.


सिंचन शाखा जळगाव जामोद यांचे कार्यक्षेत्रातील लघु पाटबंधारे प्रकल्प टाकळी, सिंचन शाखा तांदुळवाडी कार्यक्षेत्रातील ढोरपगाव, हिवरखेड १ व ३ हे शंभर टक्के पाण्याने भरला आहे. या पाचही लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास सदर धरणांचा केव्हाही पूर्ण क्षमतेने सांडवा प्रवाहीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाचे खाली नदीला पूर येण्याची दाट शक्यता आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

ढोरपगांव लघु पाटबंधारे प्रकल्पाचा सांडवा प्रवाहीत झाल्यास नदी काठावरील ६ गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये ज्ञानगंगापूर, कासारखेड, पिं.राजा, भालेगांव, ढोरपगांव व वडजी भेंडी गावांचा समावेश आहे. तसेच टाकळी धरणाचा सांडवा प्रवाहीत झाल्यास नदीला पूर येवून खामगांव तालुक्यातील भालेगांव व कुंबेफळ ही दोन गावे प्रभावीत होण्याची शक्यता आहे, असे उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, खामगांव यांनी कळविले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)