esakal | मॉंसाहेब जिजाऊंना अभिवादन, राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव यांच्या हस्ते महापूजा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Buldana Marathi News- Greetings to Monsaheb Jijau at Sindkhedraja, Maha Puja at the hands of Shivaji Raje Jadhav, descendant of Raje Lakhujirao Jadhav

छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा देऊन त्यांना घडविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा यंदा मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे कोव्हिडचे नियम पाळत साजरा होत आहे.

मॉंसाहेब जिजाऊंना अभिवादन, राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव यांच्या हस्ते महापूजा

sakal_logo
By
मुशीरखान कोटकर

सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) :  छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा देऊन त्यांना घडविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा यंदा मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे कोव्हिडचे नियम पाळत साजरा करण्यात आला.

मुख्य जन्म सोहळ्याची सुरुवात राजवाडा येथे मराठा सेवा संघाचे पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख जोडप्यासह सकाळी सहा वाजता महापूजन करून झाली. सकाळी नऊ वाजता जिजाऊ सृष्टी येथे ध्वजारोहण तर सकाळी ९ ते ११ शाहिरांचे पोवाडे आयोजित करण्यात आले.

जवळपास ११ वाजता मुख्य कार्यक्रम झाला. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे अध्यक्षस्थानी होते तर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव यांचेसह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होती.

सोशल माध्यमातून फेसबुक, युट्यूबवर हा कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात आला. शासकीय नियम व अटी सांभाळून हा कार्यक्रम साजरा होत असल्याने आपआपल्या घरीच जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले होते.

स्वराज्याची प्रेरणा जिजाऊ मासाहेब जन्मोत्सवाच्या शुभपर्वावर सूर्योदय प्रसंगी जिल्हा परिषद,नगर पालिका, सामाजिक संघटनासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आईसाहेब जिजाऊ यांची महापूजा करण्यात आली

याप्रसंगी राजमाता जिजाऊ यांचा जय जयकार करण्यात आला तर 'जिजा माऊली घे तुला वंदना ही' या जिजाऊ वंदनेच्या गजरात सुर्योदयी परिसर न्हाऊन निघाले   .

जिजाऊ जन्मोत्सव च्या पहाटे पासूनच सिंदखेड राजा शहरात मान्यवरांचे आगमन सुरू झाले.  सूर्योदय प्रथम महापूजा राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव यांच्या हस्ते सपत्नीक झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध खात्याचे कॅबिनेट मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी सपत्नीक जिजाऊंचे महापूजन केले. 

देऊळगाव राजा येथील श्री बालाजी महाराज संस्थानचे वंश पारंपारिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी जिजाऊंचे दर्शन घेऊन वंदन केले.

 खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार डॉ.खेडेकर यांनी सुद्धा पूजन केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, नगराध्यक्ष सतीश तायडे, छगनराव मेहेत्रे यांनीही जिजाऊ मॉँसाहेबांचे पूजन केले.

तर जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, उपाध्यक्ष कमल बुधवत ,पंचायत समिती सभापती नंदिनी देशमुख, उपसभापती लता खरात, काँग्रेस नेते जगन ठाकरे ,जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे, जिल्हा परिषद सदस्य जयश्री शेळके,सुनील शेळके, जि प सदस्य रामभाऊ जाधव, दिनकर देशमुख,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे,माजी नगराध्यक्ष सीताराम चौधरी  विद्यार्थी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप मेहेत्रे, माजी नगराध्यक्ष राजू आप्पा बोंद्रे ,शाम मेहेत्रे, शेख अजीम, वैभव मिनासे, यांनी अभिवादन केले.

नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष सतीश तायडे, बांधकाम सभापती आशाताई मेहेत्रे,पाणीपुरवठा सभापती ज्योती मस्के, सभापती सुमन खरात, नगरसेविका दिपाली मस्के, राजेंद्र आढाव,भिवसन ठाकरे, बालाजी मेहेत्रे,त्रिंबकराव ठाकरे,कैलास मेहेत्रे, योगेश मस्के,जिल्हा पोलीस अधीक्षक चावरीया व ठाणेदार जयवंत सातव त्यांचे सहकारी यांनीसुद्धा पोलिस प्रशासनाच्या वतीने जिजाऊंना अभिवादन केले जिजामाता राजवाडा परिसरात रांगोळी व रोषणाई करण्यात आली होती.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image