esakal | अवघे गाव रडले, मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही सोडले प्राण; मकरसंक्रांतीलाच गावावर शोककळा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Buldana Marathi News- Mother dies after childs death, mourning spreads over Ghatbori village

आईच्या प्रेमाची तुलना कुणाशीच करता येत नाही. स्वत:च्या पोटाला चिमटा काढून मुलांचे पोट भरणार्‍या आईचे ऋण केव्हाच फेडता येऊ शकत नाही.

अवघे गाव रडले, मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही सोडले प्राण; मकरसंक्रांतीलाच गावावर शोककळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

घाटबोरी (जि.बुलडाणा)  : आईच्या प्रेमाची तुलना कुणाशीच करता येत नाही. स्वत:च्या पोटाला चिमटा काढून मुलांचे पोट भरणार्‍या आईचे ऋण केव्हाच फेडता येऊ शकत नाही.

मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथील श्रीमती अन्नपूर्णाबाई काशिनाथ आप्पा काचेवार या गणेश काशिनाथ आप्पा काचेवार वय 47 वर्ष यांचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर मुलासाठी जगाचा निरोप घेते.

अल्पभूधारक शेतकरी गणेश काशीनाथआप्पा काचेवार हे 12 जानेवारीला दिवसभर शेतात तुरीची सोंगनी करून घरी आले. संध्याकाळी अचानक छाती दुःखत असल्याने मेहकर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणूक; आपल्या गावकडे येणार का ही महिला अधिकारी ?, तिच्या सौदर्याची सगळीकडेच चर्चा!

परंतु, त्यांची परिस्थिती अधिक खालावली आणि उपचारादरम्यान  त्यांचे निधन झाले. 13 जानेवारीला गणेश यांच्यावर जड अंतःकरणाने कुटुंबासह आपली आई अंत्यसंस्कार करून घरी येते.

आई श्रीमती अन्नपूर्णाबाई काशिनाथ आप्पा काचेवारला चक्कराच्या भोवळ येऊन खाली पडते. त्याच क्षणी आई अन्नपूर्णाबाईला मेहकरला रुग्णालयात दाखल करण्यात येते.

परंतु, डॉक्टरांनी रक्तदाब कमी जास्त होत असल्याच्या कारणावरून औरंगाबाद येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला. तातडीने औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हेही वाचा -  अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

परंतु, तेथे अन्नपूर्णाबाई हृदयविकाराचा झटका आल्याने मुलगा गणेश पाठोपाठ जगाचा निरोप घेतला. अशा हृदयस्पर्शी घटनेमुळे घाटबोरी गावात शोककळा पसरली. सायंकाळी मकरसंक्रांतीच्या दिवशी मोठ्या जड अंतःकरणाने अन्नपूर्णाबाईवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top