अबब!  या कारणासाठी होणार बैलाची डीएनए टेस्ट

अरूण जैन 
Tuesday, 15 September 2020

मुक्या जनावरांचा प्रामाणिकपणा सर्वश्रुत आहे. मात्र माणसे त्यांच्याशी कसाईप्रमाणे वागतांना दिसतात. शहरात ता.९ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजता एका टोळीने येथील मच्छी ले-आऊटच्या पटांगणातून एका गोऱ्ह्याला जबरदस्तीने पकडून नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस आल्याने पशुपालक व टोळीतील वाद पोलिस ठाण्यात पोहचल्याने आणि दोन्ही पक्षांनी गोऱ्ह्यावर मालकी हक्क दाखविल्याने पोलिसांनी थेट गोऱ्ह्याचा डीएनए टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बुलडाणा  : मुक्या जनावरांचा प्रामाणिकपणा सर्वश्रुत आहे. मात्र माणसे त्यांच्याशी कसाईप्रमाणे वागतांना दिसतात. शहरात ता.९ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजता एका टोळीने येथील मच्छी ले-आऊटच्या पटांगणातून एका गोऱ्ह्याला जबरदस्तीने पकडून नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस आल्याने पशुपालक व टोळीतील वाद पोलिस ठाण्यात पोहचल्याने आणि दोन्ही पक्षांनी गोऱ्ह्यावर मालकी हक्क दाखविल्याने पोलिसांनी थेट गोऱ्ह्याचा डीएनए टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील तानाजीनगर, मच्छी ले-आऊट येथील पटांगणात दररोज गुरेढोरे दिवसभर चरून थकल्यावर निवांत आराम करतात. त्या जनावरांमध्ये प्रदीप मोरे यांच्या मालकीची १० ते १२ जनावरे आहेत. ता. ९ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास येथील इंदिरा नगरातील काही इसम एका गोऱ्‍ह्याला ट्रक आणून जबरदस्तीने घेऊन जात असतांना तक्रारदार प्रदीप मोरे यांनी पाहिले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

डीएनए चाचणीवरून ग्रामपंचायत सदस्य अपात्र | eSakal

दरम्यान, त्यांनी गोऱ्हा कुठे नेता, असा प्रश्न केल्यावर त्या इसमांनी वाद घातला; मात्र परिसरातील लोक गोळा झाल्याने सदर गोऱ्हा कुणाच्या मालकीचा आहे ते पोलिस ठरविणार असा ठराव झाल्याने शुक्रवारी (ता. ११) पोलिस ठाण्यात प्रदीप मोरे यांनी तक्रार दिली आहे.

बैल पोळा सणावर पावसाचे सावट | eSakal

याबाबत पोलिसही संभ्रमात पडले असून, त्यांनी गोऱ्‍ह्याची डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रदीप मोरे यांनी गोऱ्हा माझा असून, त्यांची वंशावळीतील जनावरे आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे डीएनए टेस्ट मधील निष्कर्षच गुन्हेगार ठरविणार असून, सध्या गोऱ्हा येळगाव येथील गोरक्षणात मुक्कामी हलविला जाणार आहे. तर याबाबत ठाणेदार प्रदीप साळुंखे अधिक तपास करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana News: DNA test of bull will be held due to property dispute