esakal | Video : अरे हे काय ! बहिणीने भावाला राखी बांधायच्या ऐवजी; बहिणीनेच भावाचा व्यवसाय केला उध्दवस्त
sakal

बोलून बातमी शोधा

akola buldana news Instead of the sister tying rakhi to the brother; The sisters brothers business was ruined

मेहकर तालुक्यामधील घाटबोरीमध्ये रक्षाबंधनच्या पवित्र दिवशी बहिन बेबीताई पांडुरंग जाधव व सुनिता रमेश काळे या दोघीने आपला भाऊ प्रकाशचा अवैध दारु व्यवसाय उध्दवस्त करुन भावाला राखी बांधायच्या ऐवजी  बहिणीनेच भावाचा अवैध दारूचा व्यवसाय उध्दवस्त केला.

Video : अरे हे काय ! बहिणीने भावाला राखी बांधायच्या ऐवजी; बहिणीनेच भावाचा व्यवसाय केला उध्दवस्त

sakal_logo
By
संतोष अवसरमोल

घाटबोरी (जि.बुलडाणा) : मेहकर तालुक्यामधील घाटबोरीमध्ये रक्षाबंधनच्या पवित्र दिवशी बहिन बेबीताई पांडुरंग जाधव व सुनिता रमेश काळे या दोघीने आपला भाऊ प्रकाशचा अवैध दारु व्यवसाय उध्दवस्त करुन भावाला राखी बांधायच्या ऐवजी  बहिणीनेच भावाचा अवैध दारूचा व्यवसाय उध्दवस्त केला.

सरपंच गजानन चनेवार, पोलीस पाटील संजय चोंडकर, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर गीरी, पत्रकार संतोष अवसरमोल,यांना भाऊ समजुन राखी बांधली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

दारूबंदीमुळे नारीशक्तिच्या डोक्याला  वाढलेला उच्छाद थांबावा, दारूमुळे पिणारा स्वत: उद्ध्वस्त होतोच; सोबत कुटुंबासह गावालाही उद्ध्वस्त करत असतो.  म्हणून उभी बाटली आडवी करणारण्यासाठी  घाटबोरी मधील दारूबंदीसाठी स्त्रीशक्ती,कोरोनाच्या पार्श्वभूमी वर लॉकडाऊन मध्ये नारीशक्ती  एकवटली असून त्यांनी बाटली आडवी झालीच पाहिजे, अशी अपेक्षा ठेऊन, सरपंच गजानन चनेवार नारीशक्तिने चर्चा करुन गावातील हातभट्टी दारु चालकांचे विरुद्ध निवेदन दिले.

 गावातील काही शौकिन दारू पिऊन चौका-चौकात धिंगाना घारुन विनाकारण त्रास देत आहेत, दारुच्या व्यसनाधीनतेमुळे घरात काही वेळी खायला अन्न मिळत नाही, रोजगार नाही, , दारिद्रय़ाचा फेऱ्यात संसार अडकत आहे. दारूमुळे आमचा संसार उद्ध्वस्त होऊ नाही, व मुलाबाळांवरील अत्याचारांमध्ये वाढ होऊ नाही म्हणुन सरपंच साहेब हातभट्टी दारूची दुकाने उद्ध्वस्त करा, आमचा संसार वाचवा, अशी मागणी या घाटबोरी मधील नारीशक्ति महिलांनी गजानन चनेवार  यांच्या समोर व्यथा यावेळी मांडताक्षणीच सरपंच यांनी नारीशक्तिच्या सहकार्याने अवैध दारु व्यवसाय करणाल्या तीन व्यक्तीच्या घरातुन दारुचे डब्बे रस्त्यावर घेऊन, नारीशक्तिने अवैध दारु व्यवसाय उध्दवस्त केला.

यावेळी सरपंच गजानन चनेवार यांनी महिला शक्तीला पक्के आश्वासन दिले की, तुमचा मोठाभाऊ या नात्याने बहीनीचे म्हणजे तुमच्या रक्षणासाठी हां भाऊ तुमच्या सोबत आहे,चिंता करु नका,तुमच्या सहकार्याने दारूच्या व्यवसाय हद्दीत कायमस्करूपी हातभट्टी दारूबंदी करु असी माहिती सरपंच गजानन चनेवार यांनी दिली,व निर्णय घेण्यात आला.

यावेळी,बेबीताई पांडुरंग जाधव, सुनिता रमेश काळे, सिंधुताई कुसऴकर,अनुसूया कुसळकर,पारबताबाई कुसळकर, रेखा कुसळकर, शोभा कुसळकर,नंदा कुसळकर,कमलबाई गुंजकर,शोभाबाई जाधव,संगिता चौघुळे,मुक्ताबाई कुसऴकर,दुर्गाबाई खिल्लाले,शालु पवार,सुमन गुंजकर, वैशाली चव्हाण,अनेक महिला अवैध दारु व्यवसाय उध्दवस्त करण्यासाठी सरसावल्या होत्या
(संपादन - विवेक मेतकर)