esakal | साहेबांची हाजी-हाजी न करता प्रश्न विचारा-खासदार प्रतापराव जाधव
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Buldana News MP Prataprao Jadhav advises farmers deprived of crop insurance

यंदाच्या पीक विमा काढणीत जळगाव जामोद तालुका माघारला आहे. तर संग्रामपूर तालुका पुढे असून, हा जळगाव जामोद तालुक्यावर अन्यायच आहे. याबाबत खासदार प्रतापराव जाधव यांना विचारले असता त्यांनी ‘साहेब लोकांशी अती घनिष्ट संबंधामुळे आपला शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत’ असल्याची खंत बोलताना व्यक्त केली. मात्र साहेबांंची हाजी-हाजी न करता त्यांना जाब विचारा असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.

साहेबांची हाजी-हाजी न करता प्रश्न विचारा-खासदार प्रतापराव जाधव

sakal_logo
By
गुलाबराव इंगळे

जळगाव जामोद (जि.बुलडाणा)  ः यंदाच्या पीक विमा काढणीत जळगाव जामोद तालुका माघारला आहे. तर संग्रामपूर तालुका पुढे असून, हा जळगाव जामोद तालुक्यावर अन्यायच आहे. याबाबत खासदार प्रतापराव जाधव यांना विचारले असता त्यांनी ‘साहेब लोकांशी अती घनिष्ट संबंधामुळे आपला शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत’ असल्याची खंत बोलताना व्यक्त केली. मात्र साहेबांंची हाजी-हाजी न करता त्यांना जाब विचारा असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.


पिक विम्याच्या बाबतीत साधारणत सप्टेंबर -ऑक्टोबर दरम्यान कृषी विभागाचे कृषी सहायक, ग्राम अधिकारी ग्रामसेवक, तलाठी हे तुम्ही आपल्या शेतकऱ्याच्या शेतावर येतात. आपले लोकप्रतिनिधी सरपंच पोलिस पाटीलसुद्धा त्यांच्यासोबत असतात. आपल्या शेतातील चांगली पीक असलेल्या भागातीलच प्लॉटची ती निवड करतात.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

हलक्या दर्जाचे पीक असलेल्या भागाकडे परस्पर दुर्लक्ष करतात. आपल्या सह्या घेतात व त्यांचा अहवाल विमा कंपनी शासनाला सादर करतात. अहवाल सादर करताना हे ग्राम अधिकारी शेतकऱ्यांनाप्रती आपुलकी न ठेवता विमा कंपनी प्रती आपुलकी दाखवीतात आणि आपण मात्र या मंडळींना साहेब साहेब म्हणून डोक्यावर घेतो.

या साहेब लोकांशी शेतकऱ्यांच्या अती चांगल्या संबंधामुळे मुळेच शेतकऱ्यांना अल्प पिक विमा मिळाला तसेच काही महसूल मंडळातील शेतकरी शतप्रतिशत पीक विम्यापासून वंचित राहिले. हे शेतकरी बांधवांच्या चांगलेपणाचे बक्षीस आहे अशी खंत खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली. इतर तालुक्यांच्या तुलनेत जळगाव (जामोद) तालुक्याला एकदम नगण्य स्वरूपात कपाशीचा पिक विमा मंजूर झाला.

हा पिक विमा लगतच्या संग्रामपूर तालुक्याला सत्तावीस हजाराप्रति हेक्टर पेक्षा अधिक तर जळगाव जामोद तालुक्यातील महसूल मंडळात शून्य रुपये मिळाला ,अशी तफावत का? याविषयी त्यांच्याशी मत जाणून घेतली असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top