धक्कादायक! भिंत कोसळून मध्यप्रदेशातील मायलेकींचा सैलानीत मृत्यू, पावसाचा कहर 

अरूण जैन 
Tuesday, 11 August 2020

 पावसानं जरा उसंत घेतल्यानंतर एक धक्कादायक घटनेनं सैलानी गाव हादरलं. घराची भिंत कोसळून पडली. या दुर्घटनेमध्ये माय-लेकीचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे. या माय-लेकी मध्य प्रदेशातील खंडवा परिसरातील मूळच्या रहिवासी होत्या. बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी परिसरात त्यांनी बांधेलं घर एका क्षणात कोसळलं आणि होत्याचं नव्हतं झालं.

बुलडाणा  ः  पावसानं जरा उसंत घेतल्यानंतर एक धक्कादायक घटनेनं सैलानी गाव हादरलं. घराची भिंत कोसळून पडली. या दुर्घटनेमध्ये माय-लेकीचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे. या माय-लेकी मध्य प्रदेशातील खंडवा परिसरातील मूळच्या रहिवासी होत्या. बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी परिसरात त्यांनी बांधेलं घर एका क्षणात कोसळलं आणि होत्याचं नव्हतं झालं.

चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराई शिवारातील प्रसिद्ध सैलानी बाबा दर्गा परिसरातील एका घराची भिंत कोसळून मायलेकींचा दबून मृत्यू झाला. या दोघी मध्यप्रदेशातून आलेल्या होत्या.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराई जवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा आहे. सैलानी बाबा देशभरातील लाखो सर्वधर्मिय भक्तांचे श्रद्धास्थान आहे. अनेक लोक येथे उपचारासाठी येवून भाडयाने खोली करुण राहतात. सोमवारी (ता.१०) रात्री जोरदार पाऊस पडला. यामुळे सांडू खां जिन्नत खां यांच्या खोलीत राहणारे मायलेकींवर बाजुची भींत कोसळली. मलब्याखाली दबून या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

मृतक आईचे नाव सुगंधाबाई काजळे (वय ५५ वर्ष) व त्यांची मुलगी ललिता काजळे (वय १८) वर्ष दोघी बुटी खांडवा ( ता. खालवा जि. खंडवा, मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहेत. मागील काही दिवसांपासून ते उपचारासाठी सैलानी येथे आलेले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सैलानी बीट जमादार यशवंत तायडे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठवले आहे. याप्रकरणी रायपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana News Wall collapse kills Madhya Pradesh tourists, rains wreak havoc