Video : फाजील आत्मविश्वासाने घातला जीव धोक्यात, पुलावरून वाहत्या पाण्यात बघा काय झाले

अरूण जैन 
Thursday, 27 August 2020

फाजील आत्मविश्वासाने नको ते धाडस केले की स्वतःचा जीव जाऊ शकतो.... याचा याची देही याची डोळा प्रत्यय गावातील पांगरी केसापूर रस्त्यावर दोन युवकांना आला. या घटनेत दुचाकी वाहून गेली असली तरी प्रसंगावधानाने व गावकर्‍यांच्या सूचनेचे पालन केल्याने त्यांचा जीव वाचला एवढे निश्चित !

बुलडाणाा : फाजील आत्मविश्वासाने नको ते धाडस केले की स्वतःचा जीव जाऊ शकतो.... याचा याची देही याची डोळा प्रत्यय गावातील पांगरी केसापूर रस्त्यावर दोन युवकांना आला. या घटनेत दुचाकी वाहून गेली असली तरी प्रसंगावधानाने व गावकर्‍यांच्या सूचनेचे पालन केल्याने त्यांचा जीव वाचला एवढे निश्चित !

प्राप्त माहितीनुसार गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे केसापूर येथील धरण भरल्यामुळे नदीला मोठा पूर आलेला आहे.  यामुळे पांगरी केसापूर रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पाणी वाहत असताना देखील दुचाकीस्वार युवकांनी मोटारसायकल घालण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी न ऐकता फाजील आत्मविश्वास दाखवत गाडी पाण्यात टाकली;

मात्र अर्ध्यावर गेल्यानंतर मोटारसायकल पाण्याच्या वेगाने वाहून जाऊ लागली अशा वेळी आजूबाजूला थांबलेल्या लोकांनी त्यांना गाडी सोडून द्या, जीव वाचवा असा सल्ला दिला. तो त्यांनी ऐकल्यामुळे गाडी वाहून गेली. मात्र दोघांचे प्राण वाचल्याचे समाधान गावक-यांनी व्यक्त केले.

 या संदर्भात रायपूर पोलिसांशी संपर्क साधला असता सदर वाहन हे रायपूर येथील असून वाहन मालकाचा शोध अद्याप लागला नसल्याचे त्यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले
(संपादन - विवेक मेतकर)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldhana News Two-wheeler carried away saved lives of youth