

Akola News
esakal
अकोला: शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला असून रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या या मार्गावर रस्त्याच्या मधोमध रिक्षा थांबवून प्रवासी भरले जात आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून वाहतूक पोलिस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.