
पाच वर्षांत अकोलेकरांवर 'दीडपट' कराचा बोजा!
अकोला : महानगरपालिकेच्या मूळ हद्दीसह हद्दवाढीतील दीड कोटी मालमत्तांवर गेले पाच वर्षांत दीड पटीने मालमत्ता कराचा बोजा वाढला आहे. सन २०१६-१७ मध्ये मनपातर्फे मालमत्ता कराचे मूल्यांकन करणय्त आले होते. त्यावर्षी असलेली ३० कोटी मालमत्ता कराचे लक्ष्य आता २०२२-२३ या आर्थिक वर्षांत ८० कोटींवर पोहोचले आहे.
अकोला महानगरपालिकेची स्थापना २००१ मध्ये झाली होती. त्यानंतर सन २००२ मध्ये मनपाने मालमत्ता कराचे मूल्यांकन केले होते. त्यानंतर मताच्या राजकारणासाठी कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी मालमत्ता कराचे मूल्यांकन करण्याचे धाडस दाखविले नाही. सन २०१७ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतन मालमत्ता कराचे मूल्यांकन करण्यात आले. त्यामुळे मालमत्ता करात मोठी झाली. त्याला विरोधी पक्षाकडून मोठा विरोधही झाला.
काँग्रेसचे नगरसेवक डॉ. झिशान हुसेन यांनी थेट न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा मुद्दा रेटून धरला आहे. दरम्यान, अकोला महानगरपालिकेची मूळ हद्द व हद्दावाढीनंतरचा एकूण १२४ चौरस किलोमीटरच्या परिसरातील दीड लाख मालमत्ता व दरवर्षी नवीन मालमत्तांची पडणारी भर यातून अकोलेकरांकडून वसुल होणाऱ्या मालमत्ता कराचे लक्ष्य पाच वर्षांत दीड पटीने वाढले आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांत मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य ८० कोटींवर पोहोचले आहे.
चालू आर्थिक वर्षांत २०४ कोटी वसुलीचे लक्ष्य
अकोला महानगरपालिकेला सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांत मालमत्ता करा वसुलीचे उत्पन्न ७९.९१ कोटी अपेक्षित आहे. त्यासोबत १२४ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकित आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांत एकूण २०४ कोटी रुपयांची वसुली मालमत्ता करातून होणे अपेक्षित आहे. महानगरपालिका निवडणुकीचे वर्ष असल्याने यावर्षी मालमत्ता कराची वसुली वाढणे अपेक्षित आहे. गत आर्थिक वर्षांत ५० कोटी पेक्षा अधिक वसुली करण्यात मालमत्ता कर विभागाला यश आले होते. अकोला मनपाच्या इतिहासात प्रथमच मालमत्ता कराची ५० कोटी पेक्षा अधिक वसुली झाली होती.
Web Title: Akola Citizens Tax Increse Five Years Recover Target 80 Crore
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..