Akola News : कामात हलगर्जी सहन केली जाणार नाही

पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचा इशारा
ajit kumbhar
ajit kumbharsakal

अकोला : कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने कामात हलगर्जी, टाळाटाळ, अनियमितता केल्यास असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. पात्र व्यक्तीलाच शासकीय योजनांचा लाभ देण्यात येईल. कामात कसूर केल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी बुधवारी (ता. २६) आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

जिल्हाधिकारी पदी रूजू झाल्यानिमित्त कुंभार यांनी नियोजन सभागृहात पत्रकार परिषदेत बुधवारी (ता. २६) संवाद साधला. जिल्ह्यात कापशी पिकाला महत्त्व दिल्या जाते. त्यामुळे कृषी प्रक्रियेवर आधारित उद्याेग, कृषीशी निगडीत विकासावर भर देण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

शेती संबंधीचे प्रश्न सोडविण्यासाठी जलयुक्त शिवार, पोकरा सारख्या विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देऊ. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासारखी मोठी संस्था अकोल्यात असल्याने तेथील तंत्रज्ञान व संशोधनाच्या माध्यमातून पुढील कालावधीत सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न राहील.

अनेक ठिकाणी गाळ, अतिक्रमणासह अन्य कारणांमुळे पुराचे पाणी शेती, घरात शिरते. परिणामी नुकसान हाेते. हे टाळण्यासाठी उपाय याेजना आवश्यक असून, यासाठी सप्टेंबरपर्यंत कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकरी कुंभार म्हणाले. पत्रकार परिषदेला जिल्हा माहती अधिकारी हर्षवर्धन पवार उपस्थित होते.

ajit kumbhar
Nagpur : नागपूरकरांनो लक्ष द्या; डोळे सांभाळा, शहरात पसरली साथ, डॉक्टर म्हणाले...

शाळांची पटसंख्या वाढवणार

मुंबई महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून असताना जिल्हाधिकारी कुंभार यांनी शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी राबवलेली ‘मिशन ॲडमिशन’ मोहीम राबविली होती. त्यामुळे महापालिकेच्या शाळांची पटसंख्या वाढली. आता जिल्ह्यातील सरकारी शाळांची पटसंख्या सुद्धा वाढवण्यावर भर देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

पंचनामे लवकर होणार

जिल्हाधिकारी कुंभार मंगळवारी रूजू झाल्यावर त्यांनी पहिल्याच दिवशी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती देत जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात नुकसानाच्या पंचनाम्याच्या प्रक्रियेने वेग घेतला असून, तीन ते चार दिवसांत ते पूर्ण करण्यात येतील. त्याचप्रमाणे, सानुग्रह अनुदान वितरणही गतीने पूर्ण केले जाईल, असेही ते म्हणाले.

ajit kumbhar
Nagpur : कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

नुकसान टाळण्यासाठी कृती आराखडा

जास्त पाऊस किंवा अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढ्यांना पूर आल्याने पिकांचे व मालमत्तेचे नुकसान होते. पूरहानी रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यासाठी कृती आराखडा निर्माण करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले. कृती आराखडा सप्टेंबरपर्यंत निश्चित करण्यात येईल. त्याचप्रमाणे, सानुग्रह अनुदान वितरणही गतीने पूर्ण केले जाईल, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

निधी अखर्चित राहणार नाही

पुढील वर्ष निवडणुकांचे आहे. यापृष्ठभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी निधीबाबत भाष्य केले. जिल्हा नियोजन समितीचा निधी आगामी काळात आचार संहितेमुळे अखर्चित राहता कामा नये. त्यासाठी नियोजित विकास कामे पूर्णत्वास नेऊन १०० टक्के खर्च करण्यात येणार आहेत. त्यासोबतच प्रशासन गतीमान करण्यावर भर देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

ajit kumbhar
Nagpur News : नागपूरकरांच्या आरोग्याला ११३ केंद्रांचा ‘बूस्ट’

समस्या सोडविण्यावर राहणार भर

पत्रकार परिषदेत नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील समस्या जाणून घेत स्वत: सकारात्मकता दर्शवत नाेंदही केल्या. रस्ते, पूल, रखडलेली विकास कामे, याेजना, उपक्रमांची माहिती जाणून घेतली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नाट्यगृह, सांस्कृतिक वारसास्थळे आदी व नागरी आणि पायाभूत सुविधांशी संबंधित सर्व कामे पूर्णत्वास नेऊ. आवश्यक त्या सर्व कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com