कोरोनामुक्त बाळापुरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, बाळापूर, व्याळा दोन तर वाडेगावात अकरा जण पॉझिटिव्ह

अनिल दंदी
Saturday, 22 August 2020

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या बाळापूर शहरातील नागरिकांनी कोरोनाच्या लढ्यात सहभागी होत संपूर्ण शहर कोरोना मुक्त केले होते. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत बाळापूर शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते.

बाळापूर (जि.अकोला :  शहर कोरोना मुक्त झाल्याचा आनंद ओसंडून वाहत असतानाच शुक्रवारी (ता. २१) पुन्हा दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहरात पुन्हा खळबळ उडाली असून पुन्हा भीतीचे सावट बाळापूरवासीयांमध्ये निर्माण झाले आहे. त्याच बरोबर वाडेगाव व व्याळा येथेही कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामधे तब्बल अकरा जण वाडेगावात तर दोन व्याळा येथील आहेत.

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या बाळापूर शहरातील नागरिकांनी कोरोनाच्या लढ्यात सहभागी होत संपूर्ण शहर कोरोना मुक्त केले होते. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत बाळापूर शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या शहरात १९ मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर आतापर्यंत शहरातील तब्बल १०४ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी बारा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातील ५६० जणांची कोरोना रॅपिड टेस्ट घेण्यात आली.

आजपर्यंत १ हजार ८० जणांची तपासणी करण्यात आली असून बाधित रुग्णंनी कोरोनावर मात केली होती. त्यामुळे शहरातील जनतेने सुटकेचा निश्वास घेतला होता, परंतु शुक्रवारी (ता. २१) पुन्हा दोघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरात सर्वत्र चर्चेला उधान आल्या आहे आले आहे.

प्रशासनाने शहरातील जनतेला काटेकोरपणे कोरोना बचाव साठी नियमाचे पालन करण्याचे आव्हान केले आहे.

वाडेगावात अकरा, व्याळा येथे दोन पॉझिटिव्ह
वाडेगावात तब्बल अकरा जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासन सज्ज झाले आहे. व्याळा येथे पहिल्यांदाच दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असल्याने व्याळा येथे खळबळ उडाली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Corona infestation in Corona-free Balapur again, Balapur, Vyala two and Wadegaon eleven positive