esakal | सुधारीत आदेश; शहरातील फक्त पाच पेट्रोलपंप अत्यावश्यक सेवेसाठी राहणार सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Corona News Only five petrol pumps in the city will remain open for essential services

 कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अकोला महानगरपालिका क्षेत्रात ता. २३ ते १ मार्चपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. या संदर्भात नियमावली जाहीर करताना हॉटेल व्यावसायिक व दूध विक्रेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर अखेर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सोमवारी सुधारीत नियमावली जाहीर करण्यात आली.

सुधारीत आदेश; शहरातील फक्त पाच पेट्रोलपंप अत्यावश्यक सेवेसाठी राहणार सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अकोला महानगरपालिका क्षेत्रात ता. २३ ते १ मार्चपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. या संदर्भात नियमावली जाहीर करताना हॉटेल व्यावसायिक व दूध विक्रेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर अखेर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सोमवारी सुधारीत नियमावली जाहीर करण्यात आली.

त्यानुसार शहरातील पाच पेट्रोल पंप तर तालुक्यातील एक पंप अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय हॉटेलमधून सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत पार्सल सेवा सुरू राहणार आहे.
अकोला शहरात कोरोना रुग्णांचा वाढता प्रभाव लक्षात घेता उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तीन प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा - यंदाचा उन्हाळाही घरात काढण्याचे संकेत,  जिल्हा लॉक डाउनच्या दिशेने!

त्यात अकोला महानगरपालिका, मूर्तिजापूर व अकोट नगर पालिका क्षेत्राचा समावेश आहे. या क्षेत्रात सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहेत. यासंदर्भात सुरवातीला जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीवर काही आक्षेप नोंदविण्यात आले होते. विशेषतः हॉटेल व्यावसायिक व दूध विक्रेत्यांसाठी दिलेली वेळ गैरसोयीची होती. त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सुधारित आदेश काढला आहे.

हेही वाचा - हॉटेल बंद, पार्सल सुविधाच मिळणार, लग्न समारंभाकरिता २५ व्यक्तींना परवानगी
...................
काय आहे सुधारित आदेशात?
- खाद्यगृहे, रेस्टॉरेन्टमधून सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत पार्सल सुविधा. त्यासाठी किचन व खाद्यगृह सुरू ठेवणार.
- दूध विक्री व दुधाचे घरपोच वितरणासाठी सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ५ ते ७ ची वेळ.
- सर्व रुग्णालये व रुग्णालयाशी निगडीत सेवा नियमित सुरू राहतील.
- कोणतेही रुग्णालय बंद आधार घेवून रुग्णांना आवश्यक सेवा नाकारता येणार नाही.
- २४ तास सुरू ठेवण्यास अनुज्ञेय असलेली औषधी दुकाने वेळेनुसार२४ तास सुरू राहतील. इतर औषधांची दुकाने सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहतील.
- पूर्व नियोजित परीक्षा वेळापत्रकानुसार होतील. पालक व विद्यार्थ्यांना ओळखपत्र बंधनकारक.
- कृषी सेवा केंद्र सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत सुरू
- चिकन, मटन, मांस विक्रीची दुकाने, अंडी विक्रीची दुकाने सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत सुरू.
...................
अकोल्यातील अत्यावश्यक सेवेसाठी हे पेट्रोलपंप राहतील सुरू
- मे. वजीफदार ॲन्ड सन्, वसंत देसाई स्टेडियमजवळ
- मे. एम.आर.वजीफदार ॲण्ड कं. आळशी प्लॉट
- मे. केबीको ॲटो सेंटर शिवाजी महाविद्यालयासमोर
- औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील सर्व पंप
- मे. न्यू अलंकार सर्वो, वाशीम बायपास.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

घोटाळ्याप्रकरणी हिवरखेडच्या दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा...

आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल

पालकमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना झाला कसा?

Coronavirus; आता कठोर निर्णय, बदलेल्या विषाणूचा वाढतोय अकोल्यात संसर्ग!

खमंग वऱ्हाडी रोडगे वर तुपाची धार; पार्टीचा बेत होऊच द्या आता!