कोरोनाचा कहर सुरुच; बाराशेचा टप्पा ओलांडला, पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ५१ नव्या रग्णांची भर 

akola Corona's havoc continues; Twelve hundred milestones crossed, 51 new rugs added in positive patients
akola Corona's havoc continues; Twelve hundred milestones crossed, 51 new rugs added in positive patients

अकोला  ः जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी बाराशेचा टप्पा ओलांडला आहे. त्यासोबतच सोमवारी (ता. २२) कोरोनाग्रस्तांमध्ये ५१ रुग्णांची भर पडली आहे, तर तीन महिलांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे १९४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १४३ अहवाल निगेटिव्ह आले. असे असले तरी ४१२ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाने सर्वत्र थैमान घातलं आहे. संसर्गामुळे होणाऱ्या सदर रोगाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासकीय व शासन स्तरावर करण्यात आलेल्या सर्वच उपाययोजना रुग्णांची वाढती संख्या पाहून कमी पडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान सोमवारपर्यंत (ता. २२) एकूण ८ हजार ८११ जणांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ८ हजार ४७९, फेरतपासणीचे १३४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १९८ नमुने आहेत. त्यापैकी ८ हजार ७६२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात ७ हजार ५१९ अहवाल निगेटिव्ह आहेत, तर पॉझिटिव्ह अहवाल १ हजार २४३ आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या परिसरात आढळले नवे रुग्ण
सोमवारी (ता. २२) ५१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यात २३ महिला व २८ पुरुषांचा समावेश आहे. बाळापूर येथील आठ, अकोट फाईल, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच, गुलजारपूरा येथील चार, गंगानगर व पिंपळखुटा येथील प्रत्येकी तीन, शंकर नगर, शिवसेना वसाहत व पातुर येथील प्रत्येकी दोन, कमला नेहरु नगर, सोळासे प्लॉट, खदान, कळंबेश्वर, बार्शीटाकळी, शिवनी, अकोट, दुर्गा नगर, तारफैल, महाकाली नगर, गांधी नगर, सोनटक्के प्लॉट, गिता नगर, भगतवाडी, शिदोजी वेताळ पातूर, रजपूतपुरा, तोष्णिवाल ले आऊट येथील प्रत्येकी एक-एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यातील तेरा अहवाल अकोट फाईल येथील मनपा स्वॅब संकलन केन्द्रावरील आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com