Akola Crime : पॉलिशची बतावणी करून सोने लंपास; अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल

घरातील वयोवृद्ध सदस्य अंजनाबाई तरडेजा यांनी देखील लगेच विश्वास ठेवत गणपतीची पितळाची मूर्ती अज्ञात व्यक्तीकडे दिली.
Akola Crime
Akola Crime Sakal

अकोट - शहरातील रेल्वे स्थानक नजीक असलेल्या जिजामाता नगर परिसरात एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या घरी भेट देऊन घरातील ऐवज चकाकून देतो.

म्हणून सांगत अंदाजे साडेतीन तोड्याचे ऐवज किंमत एक लाख ७५ हजार रुपयाचा लंपास केल्याची घटना आज ता.२९ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील जिजामाता नगरात तरडेजा कुटुंब राहते. दरम्यान आज ता. २९ जुलै रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी घरात पितळचे भांडे चकाकून देण्याची पावडर आपल्याकडे असल्याची बतावणी करत प्रवेश मिळवला.

Akola Crime
Mumbai Crime News: कोण आहे गँगस्टर छोटा शकीलचा शूटर?, २५ वर्षांनंतर ठाण्यात अटक

घरातील वयोवृद्ध सदस्य अंजनाबाई तरडेजा यांनी देखील लगेच विश्वास ठेवत गणपतीची पितळाची मूर्ती अज्ञात व्यक्तीकडे दिली. मूर्ती चकाकून दिल्यानंतर घरातील आणखी काही वस्तू असतील तर आम्हाला द्या त्या पण आम्ही चकाकून देतो म्हणत चोरट्यांनी इच्छा प्रकट केली.

ऐवज चकाकून देतो या भाबळ्या आशेवर विश्वास ठेवून वयोवृद्ध अंजनाबाई तरडेजा यांनी हातातील दोन सोन्याचे कडे आणि एक अंगठी, असे अंदाजे साडेतीन तोडे सोने अज्ञात व्यक्तीच्या हवाली केले.

या नंतर एकाच भांड्यात हे दोनही ऐवज बुडवल्यानंतर अचानक पाण्याचा रंग बदलायला सुरुवात झाल्यानंतर या व्यक्तीने गरम पाणी आणायला अंजनाबाई यांना सांगितले. पाणी आणायला जाणार तेवढ्यातच चोरट्याने क्षणाचाही विलंब न करता भांड्यातील ऐवज सोबत घेऊन पसार झाला.

घरातून बाहेर पडताना निळ्या रंगाचा ड्रेस घातलेला एक व्यक्ती. घराबाहेरच उभ्या असलेल्या आपल्या दुसऱ्या साथीदाराला सोबत घेत दोघेही लाल रंगांच्या दुचाकी वरून पळून जाताना सीसी कॅमेऱ्यामध्ये कैद झाले.

या घटनेनंतर तरडेजा कुटुंबियांकडून लगेचच शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अकोट शहरचे नवनियुक्त ठाणेदार तपण कोल्हे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Akola Crime
Mumbai Rain Update : मुंबईत आज सरींवर सरी, पाणी कुठेही भरले नाही

या घटनेबाबत रिता रवींद्रप्रसाद तरडेजा यांनी शहर पोलिसांना फिर्याद दिली असून, फिर्यादीच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४२०, ४०६, ३४ भादंविच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांचा शोध घेणे सुरू असून, घटनेचा पुढील तपास अकोट शहर पोलिस करीत आहेत.

अनोळखी व्यक्तींवर विश्‍वास ठेवू नये

सोने साफ करून देण्याच्या नावाखाली किंवा सोने डबल करून देण्याच्या नावखाली फसवणूक होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही अज्ञात व्यक्तीला घरात घेऊन मौल्यवान वस्तू त्यांच्या हातात देऊ नये.

आपल्या शहरात आणि जवळपास सोने चकाकून करून देण्याची दुकाने असताना नागरिकांनी बाहेरच्या परक्या, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अकोट शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार तपण कोल्हे यांनी नागरिकांना केले आहे.

Akola Crime
Mumbai Nashik Highway : मुंबई-नाशिक महामार्ग होणार चकाचक ; वाडा-भिवंडी रस्ताही होणार खड्डेमुक्त

पदभार स्वीकारताच घडल्या दोन घटना

शहरात नवीन ठाणेदार रुजू होताच पहिल्याच दिवशी आसरा कॉलनीत सशस्त्र दरोड्याचा असफल प्रयत्न आणि त्यानंतर आज भर दुपारी शहराच्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी सोने चकाकून देतो म्हणून ऐवज घेऊन पसार होणारी घटना.

या दोन्ही घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात दिवसा ही घटना घडल्यानंतर चोरट्यांना डीबी (गुन्हे शोध) पथकाचा कुठलाच धाक राहिला नसल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com