esakal | Akola: लक्झरी बस अडवून ५० लाख रूपयांची रोकड लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

crime

अकोला : लक्झरी बस अडवून ५० लाख रूपयांची रोकड लंपास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाळापूर : अकोला येथून मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसला अडवून तीन दरोडेखोरांनी ५० लाख रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरा नजीक असलेल्या एका ढाब्यावर काल गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून पोलिस प्रशासन चांगलेच हादरले आहे. या प्रकरणात आरोपींचा शोध सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार अकोला काल सायंकाळच्या सुमारास अकोला येथून मुंबईला जाण्यासाठी लक्झरी बस अकोला लक्झरी बस स्थानकावरून मार्गस्थ झाली. दरम्यान रिधोरा परीसरात असलेल्या एका ढाब्याच्या परीसरात सदर बस तीन दरोडेखोरांनी अडवली. त्यामध्ये अकोल्यातील व्यापारी बसले होते.

हेही वाचा: पदविका (डिप्लोमा) नंतर अभियांत्रिकी

सदर व्यापारी मुंबई येथे ५० लाख रूपयांची रोकड घेऊन मुंबईला जात होते. व्यापाऱ्यांच्या मागावर असलेल्या तीन आरोपींनी पाळत ठेवून लक्झरी रिधोरा मार्गावरील स्पीड ब्रेकरजवळील ढाब्याजवळ अडविली. दरम्यान बळजबरीने त्यांच्या जवळील ५० लाख रुपयांची रोकड हिसकावून घेतली. या घटनेमुळे परिसरात एकचं खळबळ माजली. या प्रकरणात वृत्त लिही पर्यंत कुठल्याही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही. मात्र पोलिसांकडून काल रात्रभर तपास सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेनेही तपास सुरू केला आहे. आज शुक्रवारपर्यंत याप्रकरणातील आरोपींचा शोध लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

loading image
go to top