Akola Crime News : मुलानेच केली आईची हत्या! भांडण झाल्याच्या रागातून उचलले टोकाचे पाऊल

crime news
crime newsesakal


अकोला : बोरगाव मंजू पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दहिगाव गावंडे येथे ता. ४ जून २०२३ रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. नालीत आढळून आलेल्या या महिलेची हत्या तिच्याच १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने भांडण झाल्याच्या रागातून केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या तपासातून पुढे आली आहे. मुलाला अटक करण्यात आली.

crime news
CM Shinde : 'औरंगाबादच्या नामांतराचा विषय केवळ राजकारणासाठीच का?' मुख्यमंत्र्यांना विसर अन् पवार संतापले

याबाबत माहिती अशी की, दहीगाव गावंडे येथील संगीता राजू वाले (४०) ही वाशीम जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा येथील मुळ रहिवाशी हल्ली दहीगाव गावंडे येथे राहत होती. ही महिला गावातून कच्या रस्ताने अव्वी मिर्झापूरमार्गे रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी निघाली असता अज्ञात इसमाने दगडाने डोक्यावर, तोंडावर व शरीरावर ठिकठिकाणी वार करून हत्या करून प्रेत कोणाला दिसून येवू नये याकरिता रस्ताचे बाजूला असलेल्या नालीमध्ये टाकले होते. (Latest Marathi News)

त्यावर काट्या टाकून झाकून ठेवले. ही घटना ता. ४ जून रोजी घडली होती. त्यानंतर ता. ६ जून रोजी दहीगाव गावंडे शेतशिवारातील कच्या रस्त्या लगत नालीत पुरण काळे याचे शेताजवळ महिलेचे प्रेत मिळून आले. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिस स्टेशन येथे भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Marathi Tajya Batmya)

crime news
Aditya Thackeray Birthday : 'तू मूर्तिमंत उदाहरण...' सत्यजीत तांबे यांच्या आदित्य ठाकरेंना अनोख्या शुभेच्छा!

पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने दहीगाव गावंडे येथे गुन्हा दाखल झाल्यापासून तपास केला. गोपनिय माहितीवरून मयत महिलेचा मुलगा विधीसंघर्षग्रस्त बालक (वय १५ वर्षे) यास विश्वासात घेवून विचारपूस केली. त्याने आईचा खून केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वी तपास करून गुन्हा उघडकीस आणला. पुढील तपास बोरगाव मंजू पोलिस करीत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांचे मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, लिलाधर खंडारे, अन्सार शेख, राहुल गायकवाड, अनिल राठोड यांनी केली.

आई देणार होती मुलाविरुद्ध पोलिस तक्रार

मुलगा हा वाईट मार्गाला लागला असल्याने त्याचे आईसोबत भांडण झाले होते. घटनेच्या दिवशी भांडण झाल्यानंतर मुलाने आईला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आई पोलिस स्टेशनला मुलाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी निघाली होती. या रागातून अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलत आईच्या डोक्यावर दगडाने वार केला. त्याच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रेत कुणाला दिसू नये म्हणून नालीत टाकले व त्यावर काट्या टाकून तो तेथून फरार झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com