esakal | Akola: बैल चोरी करणारी टोळी जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

 बैल चोरी करणारी टोळी जेरबंद

अकोला : बैल चोरी करणारी टोळी जेरबंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : स्थानिक गुन्हे शाखेने बैल व इतर जनावर चोरी करणाऱ्या टोळीत एका सदस्याला अटक केली. आरोपीने सहा जनावर चोरीचे गुन्हे केल्याची बाब पोलिसांसमोर कबूल केली. स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश गावंडे यांना ८ ऑक्टोबर रोजी गोपनिय माहिती मिळाली की, शेख हमिद उर्फ बटुक शेख मलंग (रा. पूरपिडीत कॉलनी) व त्याचे इतर साथीदार हे काळ्या रंगाचा ऑटो क्रमांक एमएच ३० बी सी १०२८ घेवून आपातापा चौक येथे उभे आहेत.

ते जनावर चोरी करण्याचे तयारीत आहेत. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी यांच्यासह आपातापा चौक, अकोट फाईल येथे आरोपी जावून शेख हमिद उर्फ बटुक शेख मलंग (वय ४४ वर्षे, रा. पूरपिडीत कॉलनी), आरोपी सै. अनवर सै. असद उर्फ अन्नु (रा. भारत नगर, अकोट फाईल) हे ऑटो क्र. एमएच-३०-बीसी- १०२८ मध्ये बसलेले आहेत, अशा माहिती वरून सदर ऑटोला घेरावा घातला असता.

हेही वाचा: Lakhimpur : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांच्या मुलाला अटक

सै. अनवर सै. असद उर्फ अन्नु हा आरोपी पळून गेला व आरोपी शे. हमीद शे.मलंग यास ऑटोसह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले. सदर आरोपीची विचारपूस केली असता त्यांनी उरळ, बोरगांव मंजु, अकोट ग्रामीण, तेल्हारा येथे ६ जनावर चोरीचे गुन्हे केल्याची कबुला दिली. या गुन्ह्यातील एकूण ७ जनावर (गाय, गोरा, बैल व कारोड) यांची कत्तल करून मास विकल्याचे सुद्धा आरोपीने कबूल केले.

loading image
go to top