Akola Crime News : जावई निघाला सासूचा खुनी; गुन्हा उघड

दोन दिवसानंतर वैद्यकीय अहवालात मृतक महिलेच्या गळ्यावर धारधार अवजाराने जखम केल्याचे निदर्शनास आले.
Akola Crime News
Akola Crime News Sakal

Akola News : सासू नेहमी जावईवर संशय घेत होती, त्यातून अनेकदा दोघांमध्ये वाद व्हायचे. रागाच्या भरात जावईने थेट सासूचा खून करून मृतदेह शेतशिवारातील विहिरीत फेकून अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव जावईने केला. परंतु, पोलिसांनी तपासात सत्य बाहेर आणल्यावर जावईनेच सासूचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला बराचसा भाग हा आदिवासी बहुल भाग आहे त्यामधीलच पुनर्वसीत आदिवासी धारुळ गावातील रहिवासी कमलाबाई गंगाराम बेठेकर (वय ६०) ह्या ता. ३ मे रोजी इंधन आणण्यासाठी सकाळीच शेतशिवाराकडे निघाल्या. दुपारची वेळ उलटूनही कमलाबाई घरी न परतल्याने त्यांचा मुलगा आईच्या शोधार्थ बाहेर पडला.

रामापूर शेतशिवारात मुलगा पोचला असता, एका विहिरीत त्याने डोकावून पाहले, तर विहिरीत त्याच्या आईचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती अकोट ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

दोन दिवसानंतर वैद्यकीय अहवालात मृतक महिलेच्या गळ्यावर धारधार अवजाराने जखम केल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पोलिस उपनिरीक्षक बोडखे यांनी तपास सुरू केला. तपासा दरम्यान मृतक महिलेच्या जावईला संशयावरून ताब्यात घेऊन विचारणा केली असता, सासरवाडीत राहणारा मृतक महिलेचा जावई अर्जुन शंकर कासदेकरची मृतक महिलेच्या सुनेवर वाईट नजर असल्याचा संशय मृतक महिला होता. त्यामुळे सासू आणि जावई यांच्यात वाद होत होते.

त्यामुळे जावईला घरात घेण्यास कमलाबाईंचा स्पष्ट विरोध होता. याचा बदला घेण्यासाठी रागाच्या भरात ता. ३ मे रोजी दुपारच्या सुमारास रामापूर शेतशिवारात सासू आरोपीला एकटी दिसल्याने त्याने जवळील धारदार अवजाराने सासूच्या गळ्यावर वार केला आणि मृतदेह विहिरीतच फेकून दिल्याची कबुली दिली. ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com