Akola: पीक नुकसानभरपाईसाठी ४० लाख मंजूर; अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा

Maharashtra Approves Crop Compensation for Akola Farmers: अकोला जिल्ह्यातील अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या २७२ शेतकऱ्यांना शासनाकडून ४०.९२ लाख रुपयांची पीक नुकसानभरपाई मंजूर झाली आहे.
Akola

Akola

esakal

Updated on

अकोला: उन्हाळ्यातील अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर शासनाकडून दिलासा मिळाला आहे. मे महिन्यात झालेल्या नुकसानीसाठी ३३ गावांतील २७२ शेतकऱ्यांच्या १९७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानभरपाईपोटी ४० लाख ९२ हजारांची मदत मंजूर करण्यात आली आहे. या निधीमुळे खरीप हंगामाच्या तोंडावर आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा आधार मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com