esakal | हरिहरपेठ स्वॅब सेंटरवर गर्दी वाढली, दिवसभरात १४४ नागरिकांचे घेतले चाचणीसाठी नमुने
sakal

बोलून बातमी शोधा

akola Crowd increased at Hariharpeth swab center, 144 citizens took samples for testing during the day

मनपाव्‍दारे सुरू करण्‍यात आलेल्‍या हरिहरपेठ स्‍वॅब सेंटरवर कोरोना संशयित रुग्णांची संख्या वाढतच आहे. सोमवारी दिवसभरात १४४ नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले.

हरिहरपेठ स्वॅब सेंटरवर गर्दी वाढली, दिवसभरात १४४ नागरिकांचे घेतले चाचणीसाठी नमुने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला ः मनपाव्‍दारे सुरू करण्‍यात आलेल्‍या हरिहरपेठ स्‍वॅब सेंटरवर कोरोना संशयित रुग्णांची संख्या वाढतच आहे. सोमवारी दिवसभरात १४४ नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले.


अकोला महानगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्‍या वाढतच आहे. कोरोना विषाणूचा होत असलेल्‍या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील विविध भागांमध्‍ये तात्‍पुरत्‍या स्‍वरूपाचे स्‍वॅब सेंटर उभारण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍णांच्‍या संपर्कात आलेले संशयित नागरिकांची तसेच सर्दी, ताप, खोकला कोरोना सदृश्‍य लक्षणे असलेल्‍या नागरिकांची चाचणी सहजरित्‍या व जलदगतीने व्‍हावी यासाठी अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे व जिल्‍हा प्रशासन आणि जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक यांच्‍या सहकार्याने स्‍वॅब कलेक्‍शन सेंटर सुरू करून त्‍या भागातील कोरोना संशयीत नागरिकांची तपसणी करण्‍यात येत आहे.

पश्चिम झोन अंतर्गत हरिहरपेठ येथील शिवाजी टाऊन शाळा येथे सुरू करण्‍यात आलेल्‍या स्‍वॅब कलेक्‍शन सेंटरवर सोमवारी १४४ नागरिकांचे घस्‍यातील स्‍त्रावाचे नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून घेण्‍यात आले. शिबिरास या भागातील कोरोना सदृश्‍य लक्षणे असलेल्‍या नागरिकांना कोरोना चाचणी करून घेण्यासाठी नगरसेवक राजेश मिश्रा, गजानन चव्‍हाण यांचेसह स्‍थायी समिती सभापती सतीष ढगे सामाजिक कार्यकर्ते योगेश गिते यांचे मोलाचे सहकार्य प्राप्‍त झाले आहे. यावेळी मनपा उपायुक्‍त वैभव आवारे, सहा.आयुक्‍त पुनम कळंबे, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, राजेंद्र टापरे, डॉ.प्रभाकर मुदगल व उत्‍तर व पश्चिम झोन कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.