अकोला : उत्सव काळातील संदेशावर ‘सायबर’ची नजर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cyber police

अकोला शहर व जिल्हा अतिसंवेदनशिल म्हणून ओळखला जातो.

अकोला : उत्सव काळातील संदेशावर ‘सायबर’ची नजर!

अकोला - आगामी काळ हा उत्सवांचा आहे. नवदुर्गोत्सवाला सुरुवात झाली आहे. जागोजागी गरबा सुरू आहेत. पाठोपाठ विजयदशमी व ईद या उत्सवांसोबत धम्मचक्र परवर्तन दिनही साजरा होत आहे. या काळात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अकोला पोलिस सज्ज आहे. उत्सव काळातील सोशल मीडियावरून व्हायलर होणाऱ्या संदेशांवर सायबर पोलिसांची नजर राहणार असून, हुल्लडबाज, सोनसाखळी चोर व लहान मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी ५० बॉडी कॅमेरे, सहा सीसीटीव्ही व्हॅन आणि ड्रोन कॅमेरेही सज्ज आहेत.

अकोला शहर व जिल्हा अतिसंवेदनशिल म्हणून ओळखला जातो. त्यामुळे उत्सव काळात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सज्ज केली आहे. सर्व पोलिस स्टेशनमधिल गुप्तवार्ता मिळविणारी यंत्रणा सक्रिय झाली आहे. पोलिस अधिकारी व अंमलदारांकडू संवेदनशिल जागांची तपासणी केली जात आहे. तडीपारीची कारवाई केली जात आहे. नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. सर्वच पोलिस स्टेशनच्या हद्दीत पायदळ गस्त, मोबाईल पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे.

जागोजागी नाकाबंदी

उत्सव काळात शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून नजर ठेवली जातआहे. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या कर्णकर्कष आवाजाचे वाद्य, डीजेवर लक्ष ठेवले जात आहे. ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणआऱ्यांवर गुन्हे नोंदविण्यात येत आहे. अवैध पोस्टर, बॅनर, झेंडे, पताका यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अशा ठिकाणी कारवाई केली जात आहे.

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई

  • मकोका - एक

  • एमपीडीए - दोन

  • सीआरपीसी कलम १०७ (शांतता भंग करणारे संशयित) - २५८

  • सीआरपीसी कलम ११० (आभ्यासिक गुन्हेगार) - ३०

  • सीआरपीसी कलम १४४ (शांतता भंग करणारे आरोपी) - ५५०

  • सीआरपीसी कलम १४९ (गंभीर स्वरुपाचे गुन्हे) - १६३

  • मपोअ कलम ५५ (टोळीने गुन्हे करणारे) - दोन

  • मपोअ कलम ५६ (संशयित गुन्हेगार) - दोन

  • प्रोव्हिशन ॲक्ट कलम ९३ ब (वारंवार गुन्हे करणारे) - २१