धक्कादायक! वंचित बहुजन आघाडीला जिल्हाध्यक्षांच्या तालुक्‍यातच सुरुंग, माजी पंचायत समिती उपसभापतीसह कार्यकर्त्यांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 4 July 2020

माजी आमदार हरिदास भदे व बळीराम सिरस्कार यांनी वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर अकोला जिल्ह्यात पहिला धक्का वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांच्या तालुक्‍यातच दिला आहे. अकोट पंचायत समितीच्या माजी उपसभापतींसह कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सोपविला आहे.

अकोला  ः माजी आमदार हरिदास भदे व बळीराम सिरस्कार यांनी वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर अकोला जिल्ह्यात पहिला धक्का वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांच्या तालुक्‍यातच दिला आहे. अकोट पंचायत समितीच्या माजी उपसभापतींसह कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सोपविला आहे.

अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. त्यातच दोन माजी आमदार पक्ष सोडून राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे "वंचित'ला मोठा धक्का बसला असताना आता पक्षाला वेगवेगळ्या पातळीवर सुरुंग लावल्या जात आहे. त्याची सुरुवात जिल्हाध्यक्षांच्या तालुक्‍यातूनच झाली आहे. अकोट तालुक्‍यात 1984 पासून ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीशी जुळून असलेल्या कुटुंबाने अकोला शहरातून पक्ष संघटनेचे काम बघणाऱ्या समाजातील नेत्यांवर थेट आरोप करीत पक्ष संघटनेचा राजीनामा दिला आहे. अकोट पंचायत समितीच्या माजी उपसभापती सूर्यकांता रामदास घनबहादूर यांच्यासोबत तेल्हारा तालुक्‍यातील "वंचित'चे कार्यकर्ते व सूर्यकांता यांच्या भावानींही पक्ष संघटनेचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सोपविला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पक्ष नेतृत्वाकडून भेदभाव होत असल्याचा आरोप
वंचित बहुजन आघाडी व त्यापूर्वी भारिप-बमसंसोबत एक चळवळ म्हणून काम केल्यानंतरही पक्षाकडून विशेषतः अकोला शहरातील समाज नेते मंडळीकडून भावांवर सातत्याने भेदभाव करून अन्याय केला जात असल्याचा आरोप सूर्यकांता घनबहादूर यांनी त्यांच्या राजीनाम्यातून केला आहे.

माजी उपसभापती व त्यांचे दोन भाव असे एकाच कुटुंबातील दोघांनी राजीनामा सोपविला आहे. ते काही काळापासून पक्षात सक्रिय नाहीत. वंचित बहुजन आघाडीत कुणावरही अन्याय केला जात नाही. चर्चेतून मार्ग निघू शकतात.
- प्रदीप वानखडे, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी व भारिप-बमसं


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Deprived Bahujan Aghadi undermined in district president's taluka, former panchayat committee deputy chairman and other activists resign