Akola News : पालकमंत्र्यांच्या मनातील योजनांचे ‘सीमोल्लंघन’ होणार का?

नवीन पालकमंत्री जिल्ह्याला मिळाले की, नवीन योजनांची संकल्पना मांडली जाते. पालकमंत्र्यांच्या मनातील या योजनांचे मात्र कधीच ‘सीमोल्लंघन’ होताना दिसत नाही.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patilesakal

अकोला - नवीन पालकमंत्री जिल्ह्याला मिळाले की, नवीन योजनांची संकल्पना मांडली जाते. पालकमंत्र्यांच्या मनातील या योजनांचे मात्र कधीच ‘सीमोल्लंघन’ होताना दिसत नाही. आधी पोलिस आयुक्तालय, लॉजिस्किट पार्क आणि आता आयटी पार्क या आणखी मनातील एका योजनेची यात भर पडली आहे.

अकोला जिल्ह्याचे दुर्भाग्य म्हणा किंवा सुदैव्य अगदी थेट मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील पालकमंत्री या जिल्ह्याला मिळाले. डॉ. रणजित पाटील, बच्चू कडू, त्यानंतर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचेच निकटवर्तीय राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री म्हणून लाभले आहेत. यातील प्रत्येक पालकमंत्र्यांच्या कार्यकाळात एक तरी स्वप्नवत योजना अकोला जिल्ह्यासाठी राबविण्याबाबत चर्चा झाली.

डॉ. रणजित पाटील हे गृहराज्यमंत्री असताना अकोला पोलिस मुख्यालयाचा मुद्दा चर्चेत होता. बच्चू कडू यांच्या कार्यकाळातील अनेक योजना या कादावरच राहिल्यात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्री असताना अकोला एमआयडीसीमध्ये ‘लॉजिस्टिक पार्क’ उभारण्याची चर्चा सुरू झाली होती. यातील कोणतीही योजना आजपर्यंत प्रत्यक्ष मंत्रालयातपर्यंत पोहोचून कागदावर उमटल्या नाहीत.

त्यातच आता नवे पालकमंत्री विखे पाटील यांनी अकोल्यात घेतलेल्या पहिल्याच आढावा बैठकीत अकोला एमआयडीसीमध्ये ‘आयटी पार्क’ची शक्यता पर्ताळून बघण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वीचा अनुभव बघता ही मनातील योजनाही ‘सीमोल्लंघन’ करून मंत्रालयापर्यंत पोहोचत कागदावर उमेटल का, असा प्रश्न अकोलेकरांना पडला आहे.

संकल्पना पूर्तीसाठी प्रयत्नच नाही!

अकोला जिल्ह्यात दळवळण्याच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्याचा लाभ या जिल्ह्याला आतापर्यंत कधीच मिळाला नाही. त्यामुळे विकास योजनांची संकल्पना मांडल्यानंतरही ती पूर्ण करण्यासाठी हवे असलेले प्रयत्नच होताना दिसत नसल्याने हा संकल्पाना केवळ मनातील मांडेच ठरल्या आहेत. या विजयादशमीच्या निमित्ताने तरी विकास योजनांच्या संकल्पपूर्तीचा ध्यास नेते मंडळी घेतील, अशी अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com