अकाेला : चिखल तुडवत शाळेत जातात विद्यार्थी

धामणी ग्रामपंचायतचा ढिसाळ कारभार; पावसाळ्यात साचले गल्ली बोळात पाणी
Akola Dhamani Gram Panchayat school
Akola Dhamani Gram Panchayat schoolsakal

मानोरा : मानोरा पंचायत समितीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या धामणी ग्राम पंचायतमध्ये विविध विकास काम रखडलेली आहेत.पावसाळ्यात शाळा व अनेकांच्या घरासमोर पाणी साचले आहे.त्यामुळे मुलांना चिखल तुडवत शाळेत जावे लागत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात बिडीओ यांना नागरिकांनी दिलेल्या तक्रारीवरून सरपंच व सचिव यांना लेखी पत्र देऊनही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्यामुळे धामणी आणि शिवाजीनगर येथील नागरिकांच्या आरोग्याला बाधा निर्माण झाली आहे. सदर समस्या तात्काळ सोडवण्यात यावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

सध्या पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात नाली व इतर साफसफाईची कामे सरपंच व सचिव यांनी मार्गी न लावल्यामुळे शाळा व परिसरात पाणीच पाणी साचले आहे. रहादारीच्या रस्त्यावर पाणी साचल्याने ग्रामस्थाना ये- जा करण्यास अडचण भासत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही उपस्थित होत आहे. धामणी व शिवाजीनगर येथील ४० पेक्षा अधिक घरकुल लाभार्थ्यांनी प. स. स्तरावर प्रस्ताव सादर केले आहेत. परंतु त्यांना घरकुल बांधकाम करण्याची मंजुरात मिळत नसल्यामुळे मजूर लाभार्थी दररोज कामधंदे सोडून पंचायत समितीची पायरी झिजवत आहे. याबाबत सरपंच, सचिव हे बेफिकीर असल्यामुळे ग्राम पंचायतकडे लाखो रुपये विकास कामासाठी धुळखात पडून आहे.

वस्तीत जाणारा रस्तावर अतिक्रमणे केल्यामुळे रस्ता लहान झाला. त्या रस्तावर पाणी साचले आहे. याआधी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन सुद्या कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात केल्या जात नाही. सरपंच सचिव यांच्या मनमानी कारभारामुळे वस्तीतील नागरिक हैराण झाले आहे. गटविकास अधिकारी यांच्या आदेशाचे पायमल्ली केली जात आहे. २ दिवसात हा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन केल्या जाईल

- नितेश लवटे , प्रहार सेवक धामणी मानोरा

मागील आठ दिवसा अगोदर ग्रा. प. चा प्रभार मिळाला आहे. प्रशासकीय अधिकार देण्यात आला मात्र आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार मिळाला नसल्यामुळे संबंधित कामे करता येणार नाहीत.

-के. डीघोळे.

जि प वरिष्ठ शाळा शिवाजीनगर शाळेसमोर पाणीच पाणी साचले आहे. लहान मुलांना शाळेत जाता येत नाही किव्हा त्या सांड पाण्यातून मुलांना व शिक्षकांना जावे लागत आहे.दोन दिवसात सांड पाण्याचा विल्हेवाट न लावल्यास सरपंच सचिव यांचा विरोधात गावातील शाळे समोर आंदोलन केले जाईल.

-दशरथ होलगरे सामाजिक कार्यकर्ते धामणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com