अकाेला : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परिसराला घाणीचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola District Central Bank

अकाेला : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परिसराला घाणीचा विळखा

शिरपूर जैन : येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती को ऑप बँकेला घाणीचा विळखा असून बँकेत येणारे ग्राहक, कर्मचारी व परिसरातील नागरीकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.स्थानिक प्रशासनाने या लक्ष देने गरजेचे झाले आहे.

शिरपूर नगरी साधू संतांची भूमी आहे.येथील नाल्या,रस्ते यांची स्थिती दयनीय आहे. सध्या या जैनांच्या काशीत जैन गुरू आचार्य विद्यासागर जी महाराज यांचे चातुर्मासानिमित्त आगमन झाले आहे. त्यामुळे येथे दररोजच भाविकांची मोठी गर्दी होत आहे.भाविकांना येथे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे भाविकांकडून बोलल्या जात आहे. तसेच बस स्थानक ते मालेगाव रोडवर असलेल्या अकोला जिल्हा को ऑप बँकेला अनेक दिवसापासुन चौफेर घाणीचा विळखा असून बँकेत जाणारे येणारे ग्राहक, कर्मचारी, तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरीक यांना या घाणीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

अनेक दिवसापासून बँकेजवळ खोदलेल्या नालीत घाण मोठ्या प्रमाणात पाणी साचून आहे. तर गवळी पुऱ्या कडील रस्त्यावरील बाजूस असलेल्या नालीत मोठ्या प्रमाणात घाण जमा झाली आहे. त्यात प्लास्टिकच्या पिण्याच्या पाण्याच्या बॉटल, प्लास्टिक पिशव्या,दारूच्या रिकाम्या बाटल्या,कचरा आदी ने ही नाली भरली असून घाण पाणी बँकेसमोरून जाते, सदर बॉटल बँकेच्या मुख्य गेटसमोर अडकून बसतात व रस्त्यावर वाहून येतात. त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्याला मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच यामुळे परिसरात मोठी दुर्गधी पसरत आहे. परीणामी या भागात व बँकेतही मच्छरांचे प्रमाण वाढले आहे.

बँकेच्या दोन्ही बाजूला घाण साचत असून शेजारीच असलेल्या ढवळे विद्यालयाच्या मुख्य गेटवरही यामुळे मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचते. शाळेतील विदयार्थी, विदयार्थीनींना या घाण पाण्यातून कसरत करीत वाट काढत ये जा करावे लागते. या परिसरात साचलेले पाणी जाण्याकरीता व्यवस्थित मार्ग नाही तेव्हा येथे कायम स्वरूपी नाली करून घाण पाण्यास मार्ग करून देने गरजेचे आहे.अन्यथा या दुर्गधी मुळे विदयार्त्थाच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. बँके समोर व सुरक्षा भिंतीशेजारील नाली घाणीने भरली असून त्याची विल्हेवाट लावून सदर पाणी नाली द्वारे काढण्यासाठी व परिसर स्वच्छ करण्यासाठी येथील जिल्हा बँकेकडून स्थिनिक ग्रा पं ला वारंवार तोंडी व लेखी पत्राद्वारे कळविले.

मात्र यावर अद्याप कुठलीही कारवाई करणात आली नाही.बँक परीसरातील घाण व घाण पाणी काढून ग्राहकांसाठी चांगला रस्ता करून दयावा, परिणामी लहानग्यांच्या शाळेसमोर गेटवर साचत असलेले घाण पाणी निघून जाईल त्यामुळे सदर परिसर स्वच्छ होण्यास मदत होईल.याबाबत बँकेचे ग्राहक, विद्यार्थी, पालक यांनी स्थानिक प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

बँकेच्या सुरक्षा भिंती शेजारील घाण पाण्याची नाली ही सर्वांसाठी त्रासाची ठरत आहे. बँकेत दैनंदिन स्वरूपात वयोवृद्ध मंडळी, निवृत्त कर्मचारी, बालके, महिला मंडळी आदी जण येत असतात, एखादवेळी त्यांचा पाय घसरल्यास अपघात घडू शकतो. नालीतील घाण पाणी सुरक्षा भिंती खालून बँक परिसरात येते.याबाबत ग्रा.पं.ला बऱ्याचदा तोंडी व लेखी स्वरुपात कळवले आहे.

- सुनील काकडे, शाखाधिकारी,जिल्हा मध्यवर्ती बँक ,शिरपुर

Web Title: Akola Dirt In Premises Of District Central Bank Local Administration

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..