जिल्ह्यात चार ऑनलाईन रोजगार मेळाव्यातून ७९ युवकांना रोजगार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 December 2020

या रोजगार मेळाव्यासाठी विविध कंपन्यांचे १९ उद्योजक उपस्थित होते. या रोजगार मेळाव्यातून ७९ बेरोजगार युवक युवतीना रोजगार प्राप्त झाला.

अकोला : जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींना विविध क्षेत्रात नव्‍याने निर्माण होत असलेल्‍या संधी उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या दृष्‍टीने कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत जिल्ह्यात एकूण चार बेरोजगार ऑनलाईन मेळावे घेण्यात आले. या रोजगार मेळाव्याला ९५७ उमेदवारांनी उपस्थिती दर्शविली.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

या रोजगार मेळाव्यासाठी विविध कंपन्यांचे १९ उद्योजक उपस्थित होते. या रोजगार मेळाव्यातून ७९ बेरोजगार युवक युवतीना रोजगार प्राप्त झाला. राज्‍यस्‍तरीय महारोजगार मेळाव्‍यामध्‍ये नामांकित ४०० पेक्षा जास्‍त कंपन्‍यांनी आपला सहभाग नोंदवून त्‍यांच्याकडील विविध ७० हजारपेक्षा जास्‍त रिक्‍तपदे अधिसूचित केलेली आहेत. महारोजगार मेळाव्‍यात सहभाग नोंदविल्‍यानंतर निवड केलेल्‍या कंपनी किंवा उद्योजकांच्‍या सोईनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दुरध्‍वनी ईमेलव्‍दारे किंवा इतर सोईच्‍या माध्‍यमाव्‍दारे कळविण्‍यात येईल व शक्‍य असेल तिथे ऑफलाईन किंवा ऑनलाईन मुलाखती घेण्‍यात येईल.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Akola district 79 youths have got employment through four online job fairs