
अकोला : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील वर्ग खोल्यांच्या जीर्णावस्थेचा गंभीर विषय ‘सकाळ’ने वृत्तातून मांडल्यानंतर आता हा मुद्दा थेट विधान परिषदेत गाजला आहे. जिल्ह्यातील ३६५ शिकस्त वर्ग खोल्यांची दुरुस्ती व्हावी यासाठी आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत सरकारकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.