esakal | अरे बापरे! नागपूरला मागे टाकत औरंगाबादच्या दिशेने या जिल्ह्याची वाटचाल
sakal

बोलून बातमी शोधा

covid19.jpg

आता सद्यस्थितीत अकोल्यात १२९८ पॉझिटिव्ह अहवालांची संख्या झाली असून, यापैकी ८३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, ७० जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी उपराजधानी नागपूरला मागे टाकत औरंगाबादच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे.

अरे बापरे! नागपूरला मागे टाकत औरंगाबादच्या दिशेने या जिल्ह्याची वाटचाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : एप्रिलमध्ये अगदी बोटाच्या कांड्यावर मोजण्याइतकी रुग्णसंख्या असलेल्या अकोला शहरात जूनमध्ये रग्णसंख्या तेराशेच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबतच पोलिस कर्मचारी, अधिकारी, गर्भवती महिला आणि आता कारागृहातील कैद्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ही बाब अकोलेकरांच्या चिंतेत भर टाकणारी अशीच आहे. 

अकोल्यात रिकव्हरी रेटपेक्षा रुग्ण आढळण्याचा वेग जास्त असल्याचे दिसून येत आहे. कारण, जूनमध्ये रुग्णसंख्य झपाट्याने वाढली आहे. आता सद्यस्थितीत अकोल्यात १२९८ पॉझिटिव्ह अहवालांची संख्या झाली असून, यापैकी ८३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, ७० जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी उपराजधानी नागपूरला मागे टाकत औरंगाबादच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात कोरोनाने थैमान घातले असून, आतापर्यंत साडेतीन हजाराहून अधिक रूग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर अकोला जिल्ह्यात दररोज एकाचा बळी जात असून, आतापर्यंत ४६ जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत अकोल्यातील मृतकांची संख्या कमी असली, तरी येथील मृत्यूचा दर राज्याच्या दुप्पट असल्याची भयावह स्थिती आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे मोठा दिलासाही मिळत आहे. पण, यासोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू हा चिंतेचा विषय आहे. राज्यात साडे तीन हजाराहून अधिक रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यानुसार, राज्यातील मृत्यूदर हा ३.६ येवढा आहे. मात्र, या तुलनेत अकोला जिल्ह्यातील मृत्यूदर पाचच्या जवळपास असल्याचे दिसून येत आहे. 

अकोला जिल्ह्याचा हा मृत्यूदर राज्याच्या तुलनेत जास्त आहे. वास्तविक पाहता राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कमी आहे; मात्र येथे दररोज एकाचा बळी जात असल्याने जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक आहे. मृत्यूचे हे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनाने वेळीच आवश्यक पावले न उचलल्यास जिल्ह्याची परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इतर आजार असणाऱ्या रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. परंतु, या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त मधुमेह, निमोनिया, हृदयविकार, उच्चरक्तदाब असेही आजार असल्याची माहिती अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

एकाच दिवशी तीन मृत्यूची नोंद
दरम्यान बुधवारी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सोनटक्के प्लॉट येथील ७० वर्षीय पुरुष असून ते १२ जून रोजी दाखल झाले होते. अन्य एक डाबकी रोड येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्ण असून हे ९ जून रोजी दाखल झाले होते. तर कामा प्लॉट येथील ८० वर्षीय महिला रुग्ण असून ही महिला २१ जून रोजी दाखल झाली होती.