
अकोला : कृषी विभागाद्वारे यावर्षी जिल्ह्यात एक लाख २७ हजार ३०० हेक्टरवर कापूस पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, लागवडीची परवाणगी नसलेल्या परंतु, अत्यल्प खर्चात कापूस उत्पादन मिळेल अशा कपाशीच्या तणनाशक सहनशील वाणाची निवड बहुतांश शेतकऱ्यांनी केल्यामुळे व सोयाबीनला बाजारात भाव मिळत नसल्याने निश्चितच जिल्ह्यात कापूस पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.