Akola News: जिल्हा स्त्री रुग्णालयाला कायमस्वरूपी अधीक्षक; डॉ.बापुराव पवार यांची नियुक्ती : आज पदभार स्वीकारण्याची शक्यता

Hospital Administration Expected to Stabilize: अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाला अखेर कायमस्वरूपी अधीक्षक; डॉ. बापुराव पवार यांची नियुक्ती. रुग्णालयाच्या कामकाजात स्थैर्य येण्याची अपेक्षा.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: जिल्हा स्त्री रुग्णालय (लेडी हार्डिंग) येथे अखेर कायमस्वरूपी अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून परभणी जिल्ह्यातील बोरी येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.बापुराव पवार यांची अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांच्या नियुक्तीमुळे काही दिवसांपासून ढासळलेल्या रुग्णालय प्रशासनाला स्थैर्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शासन निर्णयानुसार विविध ठिकाणी रिक्त असलेल्या पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यामध्ये अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाचाही समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com