कोरोना काळात नव्या एसपीवर जिल्ह्याची धुरा, अमोघ गावकर यांची उचलबांगडी

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 27 June 2020

कोला जिल्ह्यात १५ ऑगस्ट ते १४ ऑक्टोबर (२०१९) या महिन्यांच्या कालावधीत ३५ मुली बेपत्ता झाल्या प्रकरणी पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई करीत तडकाफडकी बदली केली होती. विशेष म्हणजे या बदलीसोबतच सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांचे निलंबन केल्याचे आदेश २८ फेब्रुवारी रोजी दिले. या आदेशानंतर तब्बल पाच महिन्यांनतर अमोघ गावकर यांची उचलबांगडी करण्यात आली असून, आता त्यांच्या जागी जी. श्रीधर हे नवे पोलिस अधीक्षक म्हणुन रुजू होणार आहेत.

अकोला, ः अकोला जिल्ह्यात १५ ऑगस्ट ते १४ ऑक्टोबर (२०१९) या महिन्यांच्या कालावधीत ३५ मुली बेपत्ता झाल्या प्रकरणी पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई करीत तडकाफडकी बदली केली होती. विशेष म्हणजे या बदलीसोबतच सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांचे निलंबन केल्याचे आदेश २८ फेब्रुवारी रोजी दिले. या आदेशानंतर तब्बल पाच महिन्यांनतर अमोघ गावकर यांची उचलबांगडी करण्यात आली असून, आता त्यांच्या जागी जी. श्रीधर हे नवे पोलिस अधीक्षक म्हणुन रुजू होणार आहेत.

शहरात राहणाऱ्या एका पालकाच्या तक्रारीनुसार, त्याची अल्पवयीन मुलीला पवन प्रमोद नगरे, अलका नगरे यांनी फूस लावून पळवून नेले. या प्रकरणात संबधित पालकाने सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी तक्रार नोंदविल्यावरही मुलीचा शोध घेतला नाही. तसेच पोलिसांना आरोपींची नावे दिल्यानंतरही पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. पोलिस अधीक्षक, ठाणेदारांकडे सुद्धा सातत्याने तक्रार केल्यानंतर त्याकडे र्दुलक्ष करण्यात आले. त्यामुळे कंटाळून पालकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून कारवाईची मागणी केली होती. याचिकेवर सुनावणी करताना, दोन महिन्यात अकोला जिल्ह्यातून ३५ महिला, युवती बेपत्ता असल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली होती. न्यायालयाने पोलिसांना बेपत्ता मुलीला हजर करण्याचे निर्देश दिले होते. त्याचीही दखल पोलिसांनी घेतली नाही.त्यामुळे न्यायालयाने पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांना समन्स बजावला होता. त्यानंतरही पोलिस अधीक्षक गावकर न्यायालयात हजर झाले नाहीत. एकंदरीतच प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक र्दुलक्ष होत असल्याचा आरोप पालकाने केला होता. त्यानंतर या प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत, पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांची तडकाफडकी बदलीचे आदेश दिले.

बेपत्ता मुलगी काढली होती शोधून
यासर्व प्रक्रियेनंतर तब्बल सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीला शोधून काढण्यात अकोल पोलिसांना १२ मार्च रोजी यश आले होते. मुलीने महिला व बालकल्याण विभागासमोर दिलेल्या जुबानी रिपोर्टमध्ये आई-वडिलांसोबत राहण्याचा नकार इनकॉमेरा दिला होता.

असा आहे नवी एसपींचा परिचय
अकोल्याला जी.श्रीधर यांच्या नावाने नवीन एसपी मिळाले आहेत. जी. श्रीधर हे नागपूर येथे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यानंतर बीड येथे जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार त्यांना समर्थपणे सांभाळला. बीडमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षकपदी जुलै २०१९ पर्यंत होते. बीडमध्ये उल्लेखनिय कामगिरी करून वेगवेगळे उपक्रम राबविली. सामाजिक संस्थाना सहभागी करून घेत सखी सेल उभारणीची केली होती. अकोल्याला येण्यापूर्वी ते नागपूर येथे राज्य राखीव पोलिस बल क्रमांक चारचे समादेशक म्हणून कार्यरत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola During the Corona period, Amogh Gavkar's flag was raised on the new SP