

Farmer’s House Sealed in Akola
esakal
अकोला : राज्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले असतानाच, अकोला जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या घरावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. बाळापूर तालुक्यातील निंबा गावात गोपाल राठोड या अल्पभूधारक शेतकऱ्याचे घर महिंद्रा रुरल होम फायनान्स कंपनीने न्यायालयाच्या आदेशानुसार सील केले. या कारवाईमुळे राठोड यांच्या कुटुंबासमोर निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, दुष्काळात कर्जवसुली न करण्याच्या सरकारी आवाहनाच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.